शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Pune: हिंगणीगाडा हद्दीत दुचाकींच्या अपघातात शाळकरी मुलगा ठार, एक गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 16:07 IST

या भीषण अपघातात इयत्ता दहावीत शिकणारा गोरक्ष भंडलकर हा विद्यार्थी जागीच ठार झाला तर ऋषिकेश भंडलकर हा गंभीर जखमी झाला...

वासुंदे (पुणे) : दुचाकींच्या अपघातात शाळकरी मुलगा ठार तर एक गंभीर जखमी झाला. संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील हिंगणीगाडा हद्दीत अपघात झाला. शनिवार (दि ६) रोजी सकाळी ७.१५ वाजताचे दरम्यान हिंगणीगाडा येथील गोरक्ष भीमराव भंडलकर व ऋषिकेश रमेश भंडलकर हे दुचाकीवरून वासुंदे येथील श्री गुरुकृपा माध्यमिक विद्यालयात सकाळच्या शाळेत जात होता. त्यांच्या दुचाकीला हिंगणीगाडा (ता. दौंड) हद्दीतील दुभाजकाजवळ पाटसकडून बारामती बाजूस जाणाऱ्या भरधाव दुचाकीने पाठीमागून धडक दिली.

या भीषण अपघातात इयत्ता दहावीत शिकणारा गोरक्ष भंडलकर हा विद्यार्थी जागीच ठार झाला तर ऋषिकेश भंडलकर हा गंभीर जखमी झाला. या विद्यार्थ्यांच्या दुचाकीला ज्या दुचाकीने धडक दिली तो दुचाकीस्वार हा रायडर असून त्याच्या दुचाकीचा वेग प्रचंड असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. या अपघातात सदर विद्यार्थी चालवत असलेल्या दुचाकीचा चक्काचूर झाला आहे.

दरम्यान या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी संतप्त होऊन पालखी महामार्गावरील वाहतूक काही काळ बंद केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पाटस पोलीस चौकीचे पोलीस उप निरीक्षक सलीम शेख यांनी सहकार्यांसमवेत घटनास्थळी तातडीने धाव घेत ग्रामस्थांशी संवाद साधला व परिस्थिती पूर्व पदावर आणली.

ज्या दुभाजकाजवळ हा भीषण अपघात झाला तो दुभाजक हा चुकीचा असून त्या ठिकाणी वाहन चालकांना निदर्शनास येईल अशा कोणत्याही मार्गदर्शक सूचना अगर स्पीड ब्रेकर नसल्याने या नियमबाह्य़ दुभाजकामुळेच हा गंभीर अपघात झाला असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला असून हा दुभाजक बंद करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

गोरक्ष हा त्याच्या आई वडीलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याला दोन बहीण आहेत. कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून गोरक्ष याच्या जाण्याने भंडलकर कुटुंबावर फार मोठा आघात झाला आहे. या घटनेने हिंगणीगाडा परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणे