पुणे : वडील रागवल्याच्या कारणातून शाळकरी मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उरळी कांचन भागात घडली. श्रीराज संतोष सोनवणे (१६, रा. दत्तवाडी, उरळी कांचन, पुणे-सोलापूर रस्ता) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. श्रीराजने नुकतीच नववीची परीक्षा दिली होती. तो उरळी कांचन भागात एका शाळेत शिक्षण घेत होता. दुचाकी वापरण्याच्या कारणावरून वडील रागवल्याने श्रीराज याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. श्रीराजला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी उरळी कांचन पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. श्रीराजचे वडील शिवाजीनगर भागातील एका बँकेत कर्मचारी आहेत.