आळेफाटा येथील केंद्रावर शिष्यवृत्ती परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:13 IST2021-08-13T04:13:44+5:302021-08-13T04:13:44+5:30

आळे येथील ज्ञानमंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, ज्ञानराज इंग्रजी माध्यम शाळा आळेफाटा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व वडगाव ...

Scholarship examination at the center at Alephata | आळेफाटा येथील केंद्रावर शिष्यवृत्ती परीक्षा

आळेफाटा येथील केंद्रावर शिष्यवृत्ती परीक्षा

आळे येथील ज्ञानमंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, ज्ञानराज इंग्रजी माध्यम शाळा आळेफाटा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व वडगाव आनंद येथील श्रीमती रेऊबाई बाळाजी देवकर विद्यालय येथे या परीक्षा झाल्या. या केंद्रावर ज्ञानमंदिर हायस्कूल, ज्ञानराज इंग्रजी माध्यम शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळे. विद्या विकास मंदिर राजुरी आळेफाटा येथील शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद उर्दू शाळा, श्री जे. आर. गुंजाळ इंग्रजी माध्यम शाळा, हांडे देशमुख शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खामुंडी सदगुरू सिताराम महाराज विद्यालय पिंपरी पेंढार व रेऊबाई बाळाजी देवकर विद्यालय येथील विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांचे तापमान व ऑक्सिजन पातळी तपासणी करण्यात आली. तसेच प्रत्येक केंद्रावर आळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Scholarship examination at the center at Alephata