शिष्यवृत्ती परीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:15 IST2021-08-21T04:15:21+5:302021-08-21T04:15:21+5:30

माळेगाव: श्री विठ्ठल विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री विठ्ठल माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज भिकोबा नगर या विद्यालयातील अनुष्का ...

In the scholarship examination | शिष्यवृत्ती परीक्षेत

शिष्यवृत्ती परीक्षेत

माळेगाव: श्री विठ्ठल विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री विठ्ठल माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज भिकोबा नगर या विद्यालयातील अनुष्का राजेंद्र मदने या विद्यार्थिनीने शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये पाचवा क्रमांक मिळवला आहे.

आर्थिक दुर्बल घटकांसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षा २०२०-२१ आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना आर्थिक साह्य व्हावे म्हणून केंद्र सरकार पुरस्कृत देश पातळीवर ही शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये विद्यालयातील अनुष्का राजेंद्र मदने या विद्यार्थिनी जिल्हा गुणवत्ता यादीत पाचवा क्रमांक मिळवून शिष्यवृत्तीस पात्र ठरली आहे. यशस्वी विद्यार्थिनीस विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार पवार सर,शिष्यवृत्ती विभाग प्रमुख भानुदास भिसे व शिक्षक यांनी मार्गदर्शन केले. विद्यालयाने उज्वल यशाची परंपरा राखत तन्वी बापू शिंदे गुणवत्ता यादीत येऊन शिष्यवृत्तीस पात्र ठरली आहे. यशस्वी विद्यार्थिनीस विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तात्रय इंगळे , शिष्यवृत्ती विभाग प्रमुख सुनीता देवकाते व शिक्षक यांनी मार्गदर्शन केले.

दोन्ही विद्यालयातील यशस्वी विद्यार्थिनींचे भिकोबानगर विद्यालयाचे प्राचार्य पवार व कांबळेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक इंगळे शिष्यवृत्ती विभाग प्रमुखांचे श्री विठ्ठल विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरविंद जगताप व सचिव शिवाजी जगताप यांनी संस्थेच्या वतीने अभिनंदन केले.

अनुष्का राजेंद्र मदने, तन्वी बापू शिंदे

२००८२०२१-बारामती-०६

Web Title: In the scholarship examination