सखींना घडणार निसर्गरम्य कोकणची सफर

By Admin | Updated: December 13, 2014 00:22 IST2014-12-13T00:22:19+5:302014-12-13T00:22:19+5:30

हिरव्यागार निसर्गाचा आनंद लुटण्याची व अथांग सागराच्या लाटेवर स्वार होण्याची सुवर्णसंधी ‘लोकमत सखी मंच’ सदस्यांना मिळणार आहे.

Scenic Konkan Travel | सखींना घडणार निसर्गरम्य कोकणची सफर

सखींना घडणार निसर्गरम्य कोकणची सफर

पुणो : हिरव्यागार निसर्गाचा आनंद लुटण्याची व अथांग सागराच्या लाटेवर स्वार होण्याची सुवर्णसंधी ‘लोकमत सखी मंच’ सदस्यांना मिळणार आहे. सखी मंचच्या वतीने कोकण स्पेशल सहल आयोजित करण्यात आली असून, सदस्य नसलेल्या इतर महिलांनाही त्यामध्ये सहभागी होता येणार आहे. 
‘लोकमत सखी मंच’तर्फे खास सभासदांसाठी व इतर महिलांसाठी 16 डिसेंबर रोजी ही सहल आयोजित केली आहे. सहलीचा कालावधी दोन दिवसांचा असणार आहे. त्यामध्ये प्रसन्न पर्पल लक्झरी बसने प्रवास करण्यात येणार आहे. सोबत कोकणची माहिती देण्यासाठी प्रसन्न पर्पलतर्फे विशेष प्रवासी मार्गदर्शक असणार आहे. सहलीच्या शुल्कातच नाष्टा, शाकाहारी जेवण, चहा व राहण्याची व्यवस्था इत्यादी गोष्टी समाविष्ट आहेत.
कोकण सहलीत मुरुड, दापोली, केळशी (महालक्ष्मी मंदिर, शिवकालीन याकुबबाबा दर्गा, श्रीराम मंदिर, निसर्गनिर्मित वाळूचा डोंगर), आंजर्ले (कडय़ावरचा गणपती), कोकण कृषी विद्यापीठ (शेतीवरील वेगवेगळ्या उपक्रमांस भेट) या ठिकाणांचा समावेश आहे. या सहलीमध्ये निसर्गरम्य ठिकाणांसोबतच समुद्रकिनारी फिरण्याचा आनंद लुटता येणार आहे. महिलांना या सहलीत कोकणी पदार्थ बनविण्याचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे फिरण्याबरोबरच कोकणी पदार्थाचा आस्वाद घेता येईल.
(प्रतिनिधी)
 
नावनोंदणी आवश्यक 
सहलीला येण्यासाठी अगोदर नावनोंदणी करणो आवश्यक असून, सहल फी खालील पत्त्यावर 11 ते 5 या वेळेत आज भरणो आवश्यक आहे. सखी मंच सभासदांसाठी तीन हजार रुपये व इतर महिलांसाठी साडेतीन हजार रुपये प्रवेश शुल्क आहे. 
 
संपर्क पत्ता : लोकमत शहर कार्यालय, व्हीया वेन्टेज, 1/2, सीटीएस 55/2, एरंडवणो, लॉ कॉलेज रोड, फिल्म इन्स्टिटय़ूटजवळ, पुणो 411क्क्4. क्2क्-66848586. 

 

Web Title: Scenic Konkan Travel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.