महिलेची बदनामी; एकास अटक
By Admin | Updated: November 15, 2016 03:50 IST2016-11-15T03:50:54+5:302016-11-15T03:50:54+5:30
फेसबुकवरून महिलेचे अश्लील फोटो पाठवून बदनामी केल्याप्रकरणी एकास सिंहगड पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले़ न्यायालयाने त्याला अधिक तपासासाठी १६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

महिलेची बदनामी; एकास अटक
पुणे : फेसबुकवरून महिलेचे अश्लील फोटो पाठवून बदनामी केल्याप्रकरणी एकास सिंहगड पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले़ न्यायालयाने त्याला अधिक तपासासाठी १६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे़
संदीप वसंत थोरात (वय २६, रा़ पांडवनगर, दीपबंगला चौक) असे त्याचे नाव आहे़ याप्रकरणी एका २७ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे़ ही घटना २८ आॅगस्ट ते ९ नोव्हेंबर २०१६ दरम्यान घडली़
संदीप थोरात याने पीडित महिला व तिच्या पतीच्या मोबाईलवर या महिलेच अश्लील फोटो पाठविले़ तसेच ई-मेल व फेसबुक अकाउंट्सवर असलेले नातेवाईक, मैत्रिणी यांच्या अकाउंटवर पाठवून बदनामी केली़ तसेच हे फोटो सगळीकडे पाठविण्याची धमकी देऊन शारीरिक संबंधाची मागणी करीत होता़ आरोपीने त्याचे फेसबुक अकाउंट लॉक केले असून त्याचा पासवर्ड व ई मेल आयडी घेऊन सखोल तपास करायचा आहे़ त्याच्या घराची झडती घेऊन आणखी कोणत्या संगणकावरून त्याने हे फोटो वेगवेगळ्या प्रकारात कॉपी करुन ठेवले आहेत का, याचा तपास करायचा असल्याने पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकील ए़ के़ पाचारणे यांनी केली़ न्यायालयाने ती ग्राह्य धरली़
(प्रतिनिधी)