शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

एसबीआय ग्राहकाची रोकड लांबवणारे गजाआड, आरोपींनी केली रकमेची वाटणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2017 10:48 PM

पुणे : बाणेर येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या एका ग्राहकाला मारहाण करून त्याच्याकडील रोकड असलेली बॅग लंपास करणा-या आरोपींना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 12 तासांच्या आतमध्ये अटक केली आहे.

पुणे : बाणेर येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या एका ग्राहकाला मारहाण करून त्याच्याकडील रोकड असलेली बॅग लंपास करणा-या आरोपींना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 12 तासांच्या आतमध्ये अटक केली आहे. आरोपींकडून २ लाख ७३ हजार रुपये, गुन्ह्यात वापरलेल्या मोटार सायकल्स जप्त करण्यात आल्याची माहिती उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली.प्रमोद व्यंकटेश तेलगु (वय १९), उमेश आदिनारायण बोया (वय १९), योगेश धनराज द्रविड (वय २२, तिघेही रा. शितळानगर, देहुरोड) अशी अटक आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश कदम (वय ३०, रा. भुजबळ चौक, वाकड) हे शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ते बाणेर येथील एसबीआय आणि एचडीएफसी बँकेत पैसे भरायला जात होते. त्यांच्या बॅगमध्ये ३ लाख २३ हजार १०७ रुपये होते. ते बँकेत जात असताना अरिया टॉवर्सच्या गल्लीमध्ये मोटारसायकलवरुन आलेल्या तीन आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी तसेच दगडाने मारहाण करुन केल्यास बॅग लंपास केली होती.गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाचे पोलीस गस्त घालीत असताना ताथवडे येथे त्यांना मोटारसायकलवरुन तीन जण संशयास्पद अवस्थेत जाताना दिसले. त्यांना पोलिसांनी निरखून पाहिले असता गुन्ह्यात वापरलेल्या मोटारसायकल क्रमांक आणि आरोपींच्या मोटारसायकलचा क्रमांक एकच असल्याचे लक्षात आले. त्यानुसार पोलिसांनी गाडी आडवी घालून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे पुढील तपास सुरु आहे. ही कारवाई अतिरीक्त आयुक्त प्रदीप देशपांडे, उपायुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

टॅग्स :MONEYपैसा