शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सयाजीरावांचे कर्तृत्व गुजराथीमध्येही; अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात खंडांचे प्रकाशन होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 13:06 IST

बडोदानगरीत होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सयाजीराव गायकवाड यांच्या कार्यकर्र्तृत्वाचा मागोवा घेणाऱ्या खंडांचे प्रकाशन होणार आहे.

ठळक मुद्देसयाजीरावांची गौरवगाथा गुजराथी भाषेतही होणार शब्दबद्धगुजरात शासनाने घेतला पुढाकारमहाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण विभागातर्फे २५ खंडांचे काम हाती, त्यापैकी १२ खंडांचे काम पूर्ण

प्रज्ञा केळकर-सिंग पुणे : बडोदानगरीत होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सयाजीराव गायकवाड यांच्या कार्यकर्तृत्वाचा मागोवा घेणाऱ्या खंडांचे प्रकाशन होणार आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र शासनाप्रमाणे सयाजीरावांची गौरवगाथा गुजराथी नागरिकांपर्यंत पोहोचविता यावी, यासाठी गुजरात शासनाने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे या युगपुरुषाची गौरवगाथा गुजराथी भाषेतही शब्दबद्ध होईल.महाराष्ट्र आणि गुजरातचे ॠणानुबंध अनेक वर्षांपासूनचे आहेत. सयाजीरावांचा शिक्षण, धर्म आणि तत्त्वज्ञान याबाबतचा दृष्टिकोन, साहित्य, कला, संस्कृती याविषयीची आस्था, कलांच्या वाढीसाठी, त्यांच्या जतनासाठी बडोदा संस्थानात केलेले प्रयत्न, राज्य प्रशासनातील हातखंडा ही दोन्ही राज्यांसाठी गौरवाची बाब आहे. ही ओळख सुवर्णाक्षरांमध्ये नोंदवली जावी, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण विभागातर्फे २५ खंडांचे काम हाती घेण्यात आले. त्यापैकी १२ खंडांचे काम पूर्ण झाले असून, त्यांपैकी ६ इंग्रजीमध्ये, तर ६ खंड मराठी भाषेत संपादित करण्यात आले आहेत. शासनाच्या महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समितीतर्फे हे काम करण्यात येत आहे. पुढील वर्षी या खंडांचा हिंदी भाषेत अनुवाद होणार असल्याची माहिती समितीचे सचिव बाबा भांड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ही गौरवगाथा मराठी भाषकांप्रमाणे गुजराथी बांधवांपर्यंत पोहोचावी, यासाठी गुजरात सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत.सयाजीराव गायकवाड हे स्वातंत्र्यपूर्व भारतातील एक द्रष्टा आणि लोकशाहीवादी संस्थानिक होते. बडोदा हे त्यांचे संस्थान त्या काळात कला-साहित्यापासून ते आधुनिक बदलांपर्यंत अनेक गोष्टींसाठी वाखाणले गेले होते. उत्तम प्रशासक, द्रष्टा नेता आणि कला, साहित्याची उत्तम जाण असलेले संस्थानिक अशी सयाजीरावांची ओळख आजही कायम आहे. गुजरातचे माजी सांस्कृतिकमंत्री राजेंद्र त्रिवेदी यांच्याशी गेल्या वर्षी याबाबत चर्चा झाली होती. त्यानंतर सयाजीरावांच्या नातसून आणि महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठाच्या कुलपती राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड यांची काही शासकीय अधिकाºयांनी भेट घेतल्याची माहितीही विश्वसनीय सूत्रांनी दिली. सयाजीरावांच्या कार्यकर्तृत्वाचे विविध पैैलू सामान्यांसमोर उलगडता यावेत, यासाठी ही गौैरवगाथा अनुवादित केली जात आहे. पहिल्या १२ खंडांची छपाई बालभारतीतर्फे पूर्ण झाली असून, पुढील खंडांच्या कामालाही वेग आला आहे. सयाजीरावांचा इतिहास शब्दबद्ध करीत असताना गुजरात शासनाला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचा मानसही प्रकाशन समितीतर्फे व्यक्त करण्यात आला आहे.

बडोदा-महाराष्ट्राचे नाते होणार दृढसंमेलनाच्या स्वागताध्यक्ष महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या नातसून, महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठाच्या कुलपती राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड यांचा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला. या वेळी ‘संमेलनातून मराठी-गुजराथी साहित्याच्या आदानप्रदानाला चालना मिळेल. साहित्य संमेलनाच्या माध्यमातून बडोदा आणि महाराष्ट्र यांचे नाते दृढ करण्याचे काम होईल,’ अशा शब्दांत त्यांनी सूतोवाच केले होते.सयाजीराव गायकवाड यांच्या खंडांमध्ये त्यांनी त्या काळात लिहिलेली पत्रे, भाषणे, कायदे, सामाजिक सुधारणा, दुष्काळातील नोंदी, सुप्रशासनाबाबतचे त्यांचे विचार आदी बाबींचा समावेश करण्यात आला आहे. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारGujaratगुजरात