शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

सांगा पवार, तुम्ही महाराष्ट्रासाठी काय केलं? अमित शाह यांचा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 19:06 IST

50 वर्ष सत्तेत राहण्याची कला पवार यांच्याशिवाय कोणी करु शकत नाही ..

ठळक मुद्देबारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार कांचन कुल यांची विजय संकल्प सभा

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केलेली असताना भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी ही तीच परंपरा राखत पवारांवर निशाणा साधला.आम्ही जे केलं त्याचा हिशोब आम्ही दिला.मग आता पवारांनी सांगावं की त्यांनी महाराष्ट्रासाठी काय केलं असा थेट सवालही त्यांनी विचारला.युतीच्या बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार कांचन कुल यांच्या विजय संकल्प सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ,महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, विजय शिवतारे, रासपचे महादेव जानकर,आमदार माधुरी मिसाळ, बाळा भेगडे, राहुल कुल,बाबुराव पाचर्णे खासदार संजय काकडे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.पुढे ते म्हणाले की,आमच्याकडे कोणी हिशोब मागितले नव्हता.पण आम्ही दिला.मात्र पवारांनी बारामती, पुण्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी काय केलं हे सांगावं. लोकांना ते मागण्याचा हक्क आहे.50 वर्ष सत्तेत राहण्याची कला पवार यांच्याशिवाय कोणी करु शकत नाही.त्यांनी कुटुंबाचे राजकारण केले. त्यांना परिवाराशिवाय काहीही दिसत नाही. महाराष्ट्राला तुम्ही काय दिलंत त्याचा हिशोब सांगा.माझा युवा मोर्चाचा मुलगा तुमच्याशी बोलायला तयार आहे.शरद पवार कृषिमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्राला 1 लाख 15 हजार करोड आणि भाजप सत्तेवर आल्यावर आम्ही 4 लाख 38 हजार 700 करोड दिले . शाह म्हणाले, भाजपने परिवारवाद संपवला आहे.भाऊ, बहीण, मुलगी, जावई हे राजकारण नरेंद्र मोदींनी संपवले.राहुल गांधी म्हणाले, गरिबी हटवू.मी त्यांना विचारतो, की इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांनीही तेच सांगितलं.मग त्यांनी गरिबी का नाही हटवली?ज्यांनी गरिबी अनुभवली तेच हटवू शकतात.एक चहा विकणारी व्यक्ती आज जगात देशाचे नाव चमकवत आहे.

टॅग्स :Baramatiबारामतीbaramati-pcबारामतीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSharad Pawarशरद पवारAmit Shahअमित शहा