शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणे ‘ब्रेक’ फेल झाला ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 18:45 IST

पुणे : खरंच प्रत्येक वेळी ब्रेक फेल होते का ?

ठळक मुद्देचालकाच्या निष्काळजीपणामुळे ती बस पादचारी मार्गावर आली.सुदैैवाने बससमोर कोणी आले नाही, अन्यथा ‘काळ’ आलाच होता.

पुणे : ‘काही कामानिमित्त मी रामकृष्ण परमहंस नगरच्या फलकाजवळ उभी होते. मला रस्ता ओलांडायचा होता. पौड गावाकडून पीएमपी बस येत होती. मी ज्या ठिकाणी उभी होते, त्याच ठिकाणी ती बस येऊन धडकली. माझ्या काही अंतरावर ती बस थांबली. जर ब्रेक फेल झाले असते, तर ती थेट फलकावर येऊन धडकली असती. परंतु, चालकाच्या निष्काळजीपणामुळे ती बस पादचारी मार्गावर आली. सुदैैवाने बससमोर कोणी आले नाही, अन्यथा ‘काळ’ आलाच होता...’ हे बोल आहेत कोथरूडमध्ये झालेल्या पीएमपी बस अपघाताच्या प्रत्यक्षदर्शी अ‍ॅड. विंदा महाजन यांचे. पीएमपीचे ब्रेक फेल होण्याचा प्रकार नवीन नाही. गेल्या अनेक वर्षांची ती ‘परंपरा’ आहे. परंतु, खरंच प्रत्येक वेळी ब्रेक फेल होते का ? कारण आज (दि.१०) कोथरूड येथील रामकृष्ण परमहंस नगरमध्ये सकाळी पीएमपी बस पादचारी मार्गावर धडकली. तेव्हा चालकाने बस फेल झाल्याचे सांगितले. पण, या ‘फेल’ झालेल्या बसच्या अगदी समोरच उभ्या असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी मात्र वेगळीच माहिती समोर आणली आहे. ब्रेक फेल झाला असता, तर बस पुढे येऊन फलकाला किंवा इतर ठिकाणी धडकायला हवी होती. तसेच काहीच झालेले नाही. बस ब्रेक दाबूनच थांबली. ब्रेक दाबल्याचा आवाजही ऐकल्याचे अ‍ॅड. विंदा महाजन यांनी ‘लोकमत’ला सांगितले. आॅँखो देखा हाल... सकाळी सव्वादहाच्या सुमारास कोथरूड आगाराची बस पौडगावाहून येत होती. कोथरूड पोलिस ठाण्यासमोरील बस थांब्याअगोदर बसचा वेग कमीच होता. ती बस येत असताना अचानक पादचारी मार्गावर चढली. त्यानंतर थोडंसं पुढे आल्यावर ती थांबली. पादचारी मार्गावर येऊन धडकलेल्या या बसकडे अ‍ॅड. विंदा महाजन  पाहत होत्या. त्या ज्या ठिकाणी उभ्या होत्या. अगदी काही अंतरावर ती बस येऊन थांबली. याविषयी अ‍ॅड. विंदा महाजन म्हणाल्या, ‘‘ही घटना झाल्यानंतर मी कंडक्टरला याबाबत विचारले, तेव्हा ते म्हणाले, ब्रेक फेल झाले आहे. त्यामुळे ही घटना घडली. मी ते ऐकून अचंबित झाले. त्यांच्याशी मला वाद घालायचा नव्हता. कारण त्यांनी ऐकले नसते. त्यामुळे मी काहीच बोलले नाही. परंतु, बसचे ब्रेक फेल झालेले नव्हते. ते झाले असते, तर बस नक्कीच कुठेतरी धडकायला हवी होती. पादचारी मार्गावर येऊन थांबली नसती.’’   

टॅग्स :PMPMLपीएमपीएमएलkothrudकोथरूड