शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
2
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
3
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
4
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
5
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
6
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
7
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
8
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
9
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
10
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
11
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
12
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
13
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
14
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
15
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
16
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
17
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
18
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
19
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
20
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 

Sawai Gandharva Bhimsen Mahotsav 2024 : व्हायोलिनवादनाने जिंकली रसिकांची मने

By श्रीकिशन काळे | Updated: December 19, 2024 11:25 IST

- पं. अजय चक्रवर्ती यांच्या कसदार गायनाने सवाईच्या पहिल्या दिवसाचा समारोप  

पुणे : विख्यात व्हायोलिनवादक डॉ. एल. सुब्रमण्यम यांनी त्यांचे पुत्र व शिष्य अंबी सुब्रमण्यम यांच्या साथीने उभे केलेले अद्भुत स्वरविश्व आणि ज्येष्ठ गायक पं. अजय चक्रवर्ती यांचे कसदार गायन यांमुळे सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा उत्तरार्ध संस्मरणीय ठरला.डॉ. सुब्रमण्यम यांनी कर्नाटक शैलीतील राग अभोगी, राग नासिका भूषणी मधील रागम् तालम् पल्लवी अशा क्रमाने वादनाचे अनेक पॅटर्न सादर केले. पाश्चात्त्य अभिजात संगीताची झलकही त्यांनी प्रस्तुत केली. वादनातून विविध प्रकारच्या स्वराकृती साकारत असतानाच त्यांनी तालातील मात्रांचे खंड करून गुंतागुंतीच्या रचना सादर करून दाद मिळवली. त्यांनी सादर केलेली पावणेसहा मात्रांची बंदिश वेगळेपण जपणारी होती. सहवादकांसह जुगलबंदी पद्धतीने केलेले वादनही रंगतदार ठरले. कर्नाटक शैलीतील संगीत आणि अभिजात पाश्चात्त्य संगीत यांचे फ्युजनही वैशिष्ट्यपूर्ण होते. मिश्र, चतुश्र तसेच संकीर्ण स्वरूपाचे हे सादरीकरण रसिकांना इतके भावले की, रसिकांनी त्यांना उभे राहून मानवंदना दिली.पतियाळा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. अजय चक्रवर्ती यांच्या अभिजात गायनाने ‘सवाई’च्या पहिल्या दिवसाचा समारोप झाला. पं. चक्रवर्ती यांनी प्रारंभी उस्ताद झाकीर हुसेन यांना श्रद्धांजली अर्पण केली. हा क्षण भावुक करणारा आहे. आपल्या सगळ्यांचे लाडके उस्ताद झाकीर हुसेन आपल्याला सोडून गेले आहेत. खरे तर सोडून गेले असे म्हणता येणार नाही, ते इथेच आहेत, याची मला खात्री आहे; कारण संगीत कधी थांबत नाही; थांबणारही नाही. झाकीर हुसेन यांना प्रणाम करून मी सादरीकरणाला सुरुवात करतो, असे ते म्हणाले.ठुमरी गायनाविषयी बोलताना चक्रवर्ती म्हणाले, ‘ठुमरी हा अतिशय सुंदर गायनप्रकार आहे. ठुमरी ख्यालाप्रमाणे विस्तृत स्वरूपात गाणे शक्य आहे. मात्र, काळाच्या ओघात ठुमरी आकसली आहे. सवाई गंधर्व संगीत महोत्सवाच्या व्यासपीठावर एखादी संध्याकाळ किंवा एखादे सत्र खास ठुमरीसाठी समर्पित करायला हवे. मी स्वतः कोलकाता येथे आयटीसी संमेलनामध्ये खास ठुमरी संमेलन आयोजित करणार आहे.’ पं. अजय चक्रवर्ती यांनी राग बिहागमधील ‘चिंता ना करे' तसेच द्रुतरचना सादर केल्या. मिश्र खमाज आणि पिल्लू रागातील ठुमरीने पं. चक्रवर्ती यांनी गायनाची सांगता केली.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रmusicसंगीत