शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

तरुण कलाकारांच्या सादरीकरणाने रंगणार सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2017 17:54 IST

पुणे : सूर, ताल आणि लय यांचा त्रिवेणी संगम असलेला यंदाचा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव १३ ते १७ डिसेंबर दरम्यान रमणबाग प्रशालेत रंगणार आहे.

पुणे : सूर, ताल आणि लय यांचा त्रिवेणी संगम असलेला यंदाचा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव १३ ते १७ डिसेंबर दरम्यान रमणबाग प्रशालेत रंगणार आहे. दिगग्ज आणि युवा आशा २८ कलाकारांच्या सादरीकरणाने यंदाचा महोत्सव रंगणार आहे, अशी माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी दिली.बुधवारी १३ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता मधुकर धुमाळ यांच्या सनई वादनाने महोत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर डॉ. विजय रजपूत यांचे गायन होईल. कोलकाताचे देबाशीष भट्टाचार्य यांचे चतुरंगी वादन होईल. याच दिवशी पं. राजन आणि साजन मिश्रा यांचे गायन होणार आहे. पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीवादनाने पहिल्या दिवसाची सांगता होईल.दुसऱ्या दिवसाची सुरुवात दुपारी ४ वाजता कुमार गंधर्व यांचे नातू भुवनेश कोमकली यांच्या गायनाने होणार आहे. पतियाळा घराण्याच्या गायिका कौशिकी चक्रवर्ती यांचे गायन होणार आहे. दुसऱ्या दिवसाची सांगता मेवाती घराण्याचे संगीत मार्तंड पं. जसराज यांच्या गायनाने होणार आहे.महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात १५ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या शिष्या गायत्री जोशी यांच्या गायनाने होईल. कोलकाताचे सेनिया घराण्याचे सतारवादक कुशल दास यांचे सतारवादन रसिकांना श्रोत्यांना अनुभवता येणार आहे. पतियाळा घराण्याचे गायक सम्राट पंडित यांचे गायन होईल. तिस-या दिवसाचा समारोप ज्येष्ठ गायक पं उल्हास कशाळकर यांच्या गायनाने होईल.चौथ्या दिवशी दुपारी ३ वाजता कोलकाताचे संगीत रिसर्च अकादमीचे प्राध्यापक तुषार दत्ता यांच्या गायनाचा अनुभव श्रोत्यांना घेता येणार आहे. यानंतर मूळचे काश्मीरचे असलेले अभय रुस्तम सोपोरी यांचे संतुरवादन अनुभवता येणार आहे. यानंतर किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. उपेंद्र भट यांचे गायन होईल. यानंतर जयपूर अत्रौली घराण्याच्या गायिका आरती अंकलीकर यांचे गायन होईल. कथक नृत्यांगना प्राची शहा यांचे सादरीकरण यावेळी होणार आहे. ज्येष्ठ गायिका पदमा तळवलकर यांच्या गायनाने चौथ्या दिवसाची सांगता होणार आहे. परवानगी मिळाल्यास या दिवशी रात्री 12 पर्यंत महोत्सव सुरू राहील.१७ डिसेंबर रोजी दुपारी ११.४५ ते रात्री १० या एका वेळेत सत्र रंगणार आहे. यादिवशी महेश काळे, सुधाकर चव्हाण यांचे गायन, पदमा शँकर यांचे व्हायोलिनवादन, राजन कुलकर्णी आणि सारंग कुलकर्णी यांचे सरोडवादन होणार आहे. शेवटच्या टप्प्यात आंनद भाटे यांचे गायन, उस्ताद शुजात खान यांचे स्टार वादन होईल. डॉ. प्रभा अत्रे यांच्या गायनाने महोत्सवाचा समारोप होईल.

टॅग्स :Puneपुणे