ग्राहक पेठेतून सव्वादोन लाख लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 05:11 AM2018-05-25T05:11:01+5:302018-05-25T05:11:01+5:30

बुधवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास दुकान बंद करण्यात आले.

Savvadon million lumpas from the customer pate | ग्राहक पेठेतून सव्वादोन लाख लंपास

ग्राहक पेठेतून सव्वादोन लाख लंपास

Next

पुणे : टिळक रस्त्यावरील ग्राहक पेठ दुकानात चोरट्यांनी प्रवेश करून ३० हजार रुपये रोख आणि १५ सोन्याची नाणी, असा २ लाख २९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सूर्यकांत पाठक यांनी खडक पोलिसांत याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टिळक रस्त्यावर ग्राहक पेठ हे घरगुती वस्तूंचे भांडार आहे. बुधवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास दुकान बंद करण्यात आले. गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास दुकान उघडल्यानंतर दोनपैकी एका तिजोरीतील ६४ ग्रॅमची १५ सोन्याची नाणी आणि ३० हजार रुपये रोख चोरीला गेल्याचे आढळून आले़ सूर्यकांत पाठक यांनी याची माहिती त्वरित पोलिसांना दिली. खडक पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. ग्राहक पेठेमध्ये सध्या काम सुरू आहे. पाठीमागच्या बाजूला एक ग्रिलचे दार आहे. त्याखालून मोठी फट असल्याने तेथून चोरट्याने आतमध्ये प्रवेश करून चोरी केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. चोरट्यांनी मागील बाजूने प्रवेश केला असल्याने हा प्रकार कोणाच्या लक्षात आला नाही़

हातचलाखीने एटीएम कार्ड लांबवून १० हजार केले लंपास
पुणे : एटीएममध्ये पैसे काढायला गेलेल्या तरुणाचे एटीएम कार्ड, पिन कोड हातचलाखीने मिळवून १० हजार रुपये लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार धनकवडी, बालाजीनगर येथील युनियन बँकेच्या एटीएममध्ये बुधवारी दुपारी पावणेदोन वाजता घडला. याबाबत रोहित चव्हाण (वय २७, रा. सुपर बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. चव्हाण हे युनियन बँकेचे कार्ड घेऊन एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी गेले होते, त्या वेळी त्यांनी एटीएम कार्डचा पिन प्रेस केला. हा पिन त्यांच्यामागे उभ्या असलेल्या एकाने पाहिला़ मात्र, एटीएम मशिनमधून पैसे आलेच नाहीत. त्या वेळी पाठीमागे असलेल्या दोघांनी एटीएम कसे वापरायचे, हे सांगण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून एटीएम कार्ड घेतले. ते कार्ड शर्टाला पुसले़ त्यानंतर हातचलाखीने त्याच्याऐवजी युनियन बँकेचे दुसरे एटीएम कार्ड दिले. चव्हाण यांच्या कार्डाचा दोन वेळा वापर करुन प्रत्येकी ५ हजार असे १० हजार रुपये काढून फसवणूक केली़

Web Title: Savvadon million lumpas from the customer pate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.