शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

सावित्रीच्या लेकींनी गाजवली दिल्ली; महाराष्ट्राच्या दहापैकी दहा मुलींचा राजपथावर डंका 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2021 1:55 PM

राजपथावरील संचलन करण्यासाठी देशभरातील जे शंभर मुले, आणि शंभर मुलींचा संघ निवडला गेला त्यामध्ये महाराष्ट्रातून गेलेल्या २४ पैकी तब्बल २१ कॅडेट्सचा समावेश होता.

ठळक मुद्देदेशाच्या नेतृत्वासह तीन स्पर्धेत अव्वल, आरडी कॅम्पसाठी २४ जणांचा संघ

दीपक होमकर- पुणे : आर्मी असो, नेव्ही असो किंवा एअर विंग साऱ्याच विभागामध्ये महाराष्ट्र एनसीसीच्या गर्ल्स कॅडेटने इतर सर्व राज्यांच्या तुलनेत सरस कामगिरी करत आपला दबदबा निर्माण केला. संपूर्ण भारतातील मुलींच्या तुकडीचे राजपथावर नेतृत्व,  एअर विंग संपूर्ण भारतातून बेस्ट कॅडेटचा किताब, नेव्हल विंगमध्ये बेस्ट कॅडेट रनरअपचा किताब आणि डायरेक्टर जनरलकडून मिळणारा डी. जी. कमांडेशचा किताब अशी सर्वोत्तम कामगिरी करत सावित्रीच्या लेकींनी दिल्ली गाजविली.

प्रजासत्ताक दिनानिमित्त (आर. डी. कॅम्प) दिल्लीत झालेल्या एनसीसीच्या शिबिरातील सर्वच स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने यश मिळविले, त्यामध्ये दहा मुलींनी सिंहाचा वाटा उचलला.  यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा केवळ २४ जणांचा संघ आरडी कॅम्पसाठी दिल्लीत रवाना झाला होता. त्यामध्ये दहा मुली आणि चौदा मुलांचा सहभाग होता. विशेष म्हणजे, राजपथावरील संचलन करण्यासाठी देशभरातील जे शंभर मुले, आणि शंभर मुलींचा संघ निवडला गेला त्यामध्ये महाराष्ट्रातून गेलेल्या २४ पैकी तब्बल २१ कॅडेट्सचा समावेश होता. त्यामध्ये येथून गेलेल्या दहाच्या दहा मुलींची सामावेश होता, तर चौदापैकी अकरा मुलांचा समावेश होता. कॅडेट्सबरोबरच संघ व्यवस्थापक म्हणून त्यांच्या समवेत गेलेल्या बार्शीच्या मेजर आरुषा शेटे यांना सुद्धा डी. जी. कमांडेशचा किताब देण्यात आला. त्यामुळे खऱ्या अर्थाने महिला शक्ती दिसून आली.— कशीश मेटवाणीसमोर आकाश झाले ठेंगणेपुणे विद्यापीठामध्ये बायोटेक एमएससी (इंटिग्रेट मार्सस) कोर्स करणाऱ्या कशीश मेटवाणी ही यंदा महाराष्ट्र संघाकडून बेस्ट कॅडेटच्या (एअर विंग) स्पर्धेत उतरली होती, लेखी परीक्षा, मुलाखत, गटचर्चा अशा सर्व पातळ्यावंर तीने २८ राज्यांच्या मुलींना मागे टाकत बेस्ट कॅडेटचा किताब पटकाविला. पुढे जाऊन फायटर प्लेन पायलेट बनण्याचे ध्येय तिने ठेवले असून त्यासाठीचे प्रशिक्षण घेण्यास तिने सुरवात केली आहे.— तनया नलवडेचे कर्तत्व सागराहून गहरेपुण्यातील मॉडर्न महाविद्यालयात बीएससी करणाऱ्या तनया नलवडे ही महाराष्ट्रासंघाकडून बेस्ट कॅडेटसाठी (नेवल विंग)च्या स्पर्धेत उतरली होती. लेखी परीक्षा, मुलाखत, गटचर्च अशा सर्व पातळ्यांवर तिने २८ राज्यांच्या सर्व मुलींना मागे टाकत बेस्ट कॅडेटच्या दुसऱ्या क्रमांकाचा किताब पटकाविला. आंध्र प्रदेशच्या नेव्हल विंगच्या मुलीने तिच्यावर केवळ एक गुणानी मात केली.  विमाननगर येथील एअरफोर्स स्कूलमध्ये तिचे शिक्षण झाले असले, तरी तिने इंडियन नेव्हीमध्येच करिअर करायचे ठरवले आहे.—समृध्दी संतने केले देशाचे नेतृत्वअमरावती येथील महाविद्यालयात शिकणारी समृध्दी संत हिने राजपथावर झालेल्या संचलनात मुलींच्या राष्ट्रीय तुकडीचे नेतृत्व केले. २८ राज्यांतून आलेल्या सर्व मुलींमधून सुमारे शंभर मुलींची निवड राजपथावरील संचलनासाठी झाली होती. त्या शंभर मुलींचे नेतृत्व करण्याचा बहमान समृध्दीला मिळाला. इंडिअन आर्मी मध्ये करीअर करण्यासाठी तीने यूपीएसची तयारी सुरू केली असून त्यासाठी एनसीसीची विशेष मदत तिला झाल्याचे तिने सां.गितले—द्यानवी ककोनियाला अधिकाऱ्यांची पसंतीपुण्यातील मॉडर्न कॉलेजध्ये बीएससी बायोटक करणारी द्यानवी ककोनियाला हिने डीजी कमांडेशन हा किताब पटकाविला. एनसीसीमधील तीन वर्षांत कॅडेटची संपूर्ण कामगिरी कशी आहे त्यावरून हा किताब दिला जातो. या स्पर्धेसाठीही २८ राज्यांतून आलेल्या मुलींनी स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये द्यानव सर्वोत्तम ठरली. इंडियन आर्मीमध्ये करिअर करणार असून त्यासाठी तिने डिफेन्स सर्व्हिसेस परीक्षांचा अभ्यास सुरु केला असल्याचे सांगितले. 

टॅग्स :Puneपुणेdelhiदिल्लीWomenमहिलाRepublic Dayप्रजासत्ताक दिन