सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृहात विद्यार्थिनीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 17:24 IST2018-01-15T17:24:44+5:302018-01-15T17:24:54+5:30
पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहात एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. रेश्मा गायकवाड असे या आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृहात विद्यार्थिनीची आत्महत्या
पुणे : पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहात एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. रेश्मा गायकवाड असे या आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.
रेश्मा गायकवाड ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बॉटनी अर्थात वनस्पती शास्त्रच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होती. तिने वसतिगृहातील नंबर 3 मधील रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. रेश्मा ही मूळची पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील आहे.
दरम्यान, रेश्मा गायकवाड हिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत उलटसुलट चर्चा विद्यापीठ परिसरात सुरु आहे.
सविस्तर वृत्त लवकरच...