शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पुणे विद्यापीठाच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षा जूनच्या तिसऱ्या आठवड्यापासून सुरू होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 20:47 IST

परीक्षा मंडळाच्या बैठकीत निर्णय; प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण २५ जून पर्यंत जमा करावे लागणार 

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षा जूनच्या तिसऱ्या आठवड्यापासून टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय शनिवारी विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. दुसऱ्या सत्राची परीक्षा सुद्धा ऑनलाइन पद्धतीनेच होणार असून, विद्यापीठाने १५ मे पासूनच या परीक्षांचे अर्ज भरून घेण्यास सुरुवात केली आहे. विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत दुसऱ्या सत्रातील परीक्षा घेण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

प्रथमतः कला वाणिज्य आणि विज्ञान या अभ्यासक्रमाच्या परीक्षा जूनच्या तिसऱ्या आठवड्यापासून सुरु करून अभ्यासक्रमाच्या परीक्षा टप्प्याटप्प्याने घेण्याबाबत परीक्षा मंडळाच्या बैठकीत एकमत झाले. तसेच प्रात्यक्षिक परीक्षांचे गुणही महाविद्यालयांकडून स्वीकारण्याबाबत कालावधी निश्चित करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे शैक्षणिक व परीक्षेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडली आहे. त्यातच करोनामुळे महाविद्यालये आणि विद्यापीठ बंद असून ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये महिन्यात होणारी विद्यार्थ्यांची प्रथम सत्र परीक्षा कोरोनामुळे एप्रिल महिन्यापासून घ्यावी लागली. यंदा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने एसपीपीयु एज्युटेक फाऊंडेशनच्या सहकार्याने ऑनलाइन परीक्षा योग्य पद्धतीने घेतली. यामुळे विद्यार्थ्यांना फार तांत्रिक अडचणी आल्या नाहीत. विद्यापीठाला १० एप्रिलपासून प्रथम सत्रची परीक्षा ऑनलाइन व प्रॉक्टर्ड पद्धतीने घेण्यात यश आले. दुस-या सत्राची परीक्षा सुद्धा याच पद्धतीने होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. -------- प्रथम सत्राची परीक्षा संपत आली असून दुसऱ्या सत्रातील परीक्ष लवकर घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती. त्यामुळे विद्यापीठाने दुसऱ्या सत्राच्या परीक्षेचे नियोजन करण्याचे काम हाती घेतले. त्यानुसार या परीक्षा येत्या जूनपासून सुरू होणार आहेत. परंतु, इतक्या कमी कालावधीत विद्यार्थ्यांना अभ्यास करणे शक्य होणार आहे का? तसेच दुसऱ्या सत्रातील सर्व अभ्यासक्रम जूनच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्ण करणे शक्‍य होणार आहे का ? असा सवाल उपस्थित होत आहे. --------- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या प्रात्यक्षिक परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यमापनाचे गुण महाविद्यालयाकडून प्राप्त झाल्याशिवाय निकाल जाहीर करता येत नाही. त्यामुळे महाविद्यालयांनी येत्या जूनपर्यंत विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेऊन त्यांचे गुण येत्या २५ जूनपर्यंत विद्यापीठाकडे जमा करावेत, असाही निर्णय परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. - डॉ संजय चाकणे, सदस्य, व्यवस्थापन परिषद , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.

टॅग्स :Puneपुणेexamपरीक्षाStudentविद्यार्थीcorona virusकोरोना वायरस बातम्याPune universityपुणे विद्यापीठ