शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
7
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
8
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
9
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
10
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
11
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
12
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
13
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
14
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
15
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
16
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
17
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
18
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
19
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
20
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी अतुल पाटणकर यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 19:52 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागात प्रशासकीय व आर्थिक शिस्त आणण्याच्या दृष्टीने अतुल पाटणकर यांचे महत्वपूर्ण योगदान होते.

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी चार्टर्ड अकाउंटंट अतुल पाटणकर (वय ५३) यांचे बुधवारी अल्पशा आजाराने रोजी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे आई, वडील, बहिण, पत्नी व मुलगी असा परिवार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांच्यासह सर्व अधिकारी व व्यवस्थापन परिषद सदस्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. विद्यापीठात वित्त अधिकारी म्हणून त्यांनी अडीच वर्षे कामकाज पाहिले. स्पष्टवक्तेपणा, प्रामाणिकपणा ही त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये होती. त्यांच्या जाण्याने विद्यापीठातील अधिकारी व कर्मचा-यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. बुधवारी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, पाटणकर यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांना श्रद्धांजली अर्पण करून बैठक स्थगित करण्यात आली.---------------------------सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागात प्रशासकीय व आर्थिक शिस्त आणण्याच्या दृष्टीने अतुल पाटणकर यांचे महत्वपूर्ण योगदान होते. त्यांच्या जाण्याने विद्यापीठाची न भरून येणारी हानी झाली आहे.- प्रा. डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

टॅग्स :PuneपुणेPune universityपुणे विद्यापीठDeathमृत्यू