शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिकार मंडळाची आज निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 6:56 AM

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यापीठ अधिसभेवरील प्राचार्य प्रतिनिधी, प्राध्यापक प्रतिनिधी, विद्या परिषद, अभ्यास मंडळांसाठी रविवार, दि. २१ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. यासाठी ४५ मतदान केंद्रांवर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार आहे. पुणे, नगर व नाशिक जिल्ह्यातून एकूण १० हजार ५९४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यापीठ अधिसभेवरील प्राचार्य प्रतिनिधी, प्राध्यापक प्रतिनिधी, विद्या परिषद, अभ्यास मंडळांसाठी रविवार, दि. २१ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. यासाठी ४५ मतदान केंद्रांवर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार आहे. पुणे, नगर व नाशिक जिल्ह्यातून एकूण १० हजार ५९४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.अधिसभेवर प्राचार्य गटातून १० सदस्य, अध्यापक गटातून १० सदस्य, विद्यापीठ अध्यापकांतून ३ सदस्य व प्रत्येक अभ्यास मंडळावर ३ विभागप्रमुख निवडून द्यावयाचे आहेत. प्राचार्य गटातून खुल्या गटातील ५ जागांसाठी ८ उमेदवार रिंगणातआहेत. तर राखीव जागांपैकी अनुसूचित जाती या संवर्गातून दोन उमेदवारांमध्ये लढत होत आहे. अन्य इतर मागास प्रवर्ग, महिला, भटक्या जमाती, अनुसूचित जमाती या संवर्गातील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. प्राचार्य गटासाठी ३०३ मतदार आहेत.अध्यापक शिक्षक संघातून १० जागांसाठी मोठी चुरस आहे. या जागांसाठी स्पुक्टो-पुटा पॅनल व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शिक्षक संघ पॅनल यांनी उमेदवार उभे केले आहेत. खुल्या गटातील ५ जागांसाठी ११ उमेदवार आहेत. तर अनुसूचित जाती संवगार्तून एका जागेसाठी ६, अनुसूचित जमाती गटातून एका जागेसाठी २ उमेदवार, डीटीएनटी गटातून एका जागेसाठी ३ उमेदवार, इतर मागास प्रवगार्तून एका जागेसाठी २, तर महिला गटातून एका जागेसाठी ३ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. अध्यापक गटासाठी १० हजार २९१ मतदार आहेत.विद्या परिषदेच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा आणि मानवविज्ञान विद्याशाखा या गटातून उमेदवार निवडणूक लढवित आहेत. विद्यापीठ अध्यापक गटातील ३ जागांसाठी मतदान होत आहे. त्यासाठी दोन्ही पॅनलकडून विजयाचा दावा केला जात आहे. विद्यापरिषदेसाठी ५ हजार ३७२ मतदार आहेत.विद्यापीठाच्या विविध अभ्यास मंडळांच्या १८३ जागांसाठी निवडणूक होणार होती; परंतु विज्ञान तंत्रज्ञान विद्याशाखेची ६ अभ्यास मंडळे, वाणिज्यची ११, मानव्य विद्याशाखेची५ आणि आंतरविद्याशाखेच्या २ अभ्यास मंडळांवरील ७२ जागांवरबिनविरोध निवड झाली आहे. प्रत्येक अभ्यास मंडळ हे तीन सदस्यांचे असते. त्यामुळे अभ्यास मंडळांच्या १११ जागांसाठी निवडणूक पार पडत आहे. रविवारी मतदान पार पडल्यानंतर मंगळवार, दि. २३ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.मतदान केंद्रात मोबाईल वापरण्यास मनाई-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिकार मंडळाच्या निवडणुकीमध्ये मतदान केंद्राच्या आत मोबाईल अथवा इतर विद्युत संचरण उपकरणे घेऊन जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. मोबाईलमधून मतपत्रिकेचा फोटो काढताना आढळल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रभारी कुलसचिव डॉ. अरविंद शाळिग्राम यांनी स्पष्ट केले आहे.अध्यापक शिक्षक संघातून १० जागांसाठी मोठी चुरस आहे. या जागांसाठी स्पुक्टो-पुटा पॅनल व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शिक्षक संघ पॅनल यांनी उमेदवार उभे केले आहेत.

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठElectionनिवडणूक