कर्नलवाडीत प्रभातफेरी काढून सावित्रीबाई फुले जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:09 IST2021-01-04T04:09:08+5:302021-01-04T04:09:08+5:30
मुलगी शिकली प्रगती झाली, बेटी बचाव-बेटी पढाव अशा घोषण देत कर्नलवाडी (ता. पुरंदर) येथील अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढत सावित्रीबाई ...

कर्नलवाडीत प्रभातफेरी काढून सावित्रीबाई फुले जयंती साजरी
मुलगी शिकली प्रगती झाली, बेटी बचाव-बेटी पढाव अशा घोषण देत कर्नलवाडी (ता. पुरंदर) येथील अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंची वेषभूषा केली होती. कर्नलवाडी ग्रामपंचायत अंतर्गत कोंडेवाडी, ब्राह्मणदरा, झिरपवस्ती येथील अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढून ग्रामपंचायतीच्या सभागृहात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. दोन मुलींनंतर नसबंदी केल्याबद्दल शोभा राहुल गोरगल, तर महिला बचतगटाचे उत्तम कार्य केल्याबद्दल मनीषा मदने यांचा या वेळी सन्मान करण्यात आला. आबोली निगडे व बबन मदने यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी अंगणवाडी सेविका शोभा निगडे, कोंडेवाडीच्या मुमताज अमिनगड, झिरपवस्तीच्या सुवर्णा भोसले, ब्राह्मणदराच्या छाया रासकर, मदतनीस पुष्प कर्नवर, निमा कदम यांसह ज्येष्ठ नागरिक दिनकर भोसले, पालक व युवक उपस्थित होते.