सावित्रीबाई फुलेंचा जीवनसंघर्षातून प्रेरणा घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:26 IST2021-01-08T04:26:04+5:302021-01-08T04:26:04+5:30
पुणे : अठराव्या शतकात अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही सावित्रीबाई फुले यांनी केलेले ...

सावित्रीबाई फुलेंचा जीवनसंघर्षातून प्रेरणा घ्यावी
पुणे : अठराव्या शतकात अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही सावित्रीबाई फुले यांनी केलेले कार्य, त्यांचा जीवनसंघर्ष प्रत्येकाने स्मरणात ठेवून प्रेरणा घ्यावी, आज सर्वांना शिक्षणक्षेत्राद्वारे एक स्वतंत्र आयुष्यजगण्याची संधी मिळत आहे तर त्याचे खरे श्रेय सावित्रीबाई फुलेंना आहे, असे मत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या पुण्याच्या सहायक आयुक्त अनुपमा पवार यांनी व्यक्त केले.
यशस्वी ॲकॅडमी फॉर स्किल्स संस्थेच्यावतीने सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिनानिमित्त शिवाजीनगर येथील महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेतील विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र वितरण करताना त्या बोलत होत्या.
''''यशस्वी'''' संस्थेच्या संचालिका स्मिता धुमाळ, संचालक राजेश नागरे, योगेश रांगणेकर, शमिकातांबे, ईशा पाठक, स्निग्धा, रागिणी वळसे, शाम वायचळ, ज्ञानेश्वर गोफण उपस्थित होते.
पवार म्हणाल्या, शासनाची कौशल्यप्रशिक्षण योजना ही चांगली आहेच, मात्र ''''यशस्वी'''' सारख्या संस्थेतील प्रशिक्षक जेव्हा पूर्ण प्रभावीपणे या योजनांची अंमलबजावणी करतात. तेव्हाच विद्यार्थ्यांना खरे कौशल्य प्रशिक्षण प्राप्त होते आणि ते स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आत्मनिर्भर होताना दिसतात.
फोटो ओळ : ४) ''''यशस्वी'''' संस्थेतर्फे आयोजित प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या प्रशस्तीपत्र वितरण कार्यक्रमात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशस्तीपत्र प्राप्त विद्यार्थ्यांसमवेत (बसलेले डावीकडून) स्मिता धुमाळ, मेघा कुलकर्णी, अनुपमा पवार आणि राजेश नागरे.
(फोटो : हॅलो सिटीत पीएमकेवीवाय फोटा-४ या नावाने आहे.)