...पुन्हा सावित्रीबाई!

By Admin | Updated: January 29, 2015 02:25 IST2015-01-29T02:25:44+5:302015-01-29T02:25:44+5:30

प्रत्येक महिन्याच्या २० तारखेला महापालिकेची सर्वसाधारण सभा होत असते. या सभेला विविध विभागांचे प्रमुख अधिकारी तसेच नगरसेवक उपस्थित असतात

Savitribai again! | ...पुन्हा सावित्रीबाई!

...पुन्हा सावित्रीबाई!

पिंपरी : प्रत्येक महिन्याच्या २० तारखेला महापालिकेची सर्वसाधारण सभा होत असते. या सभेला विविध विभागांचे प्रमुख अधिकारी तसेच नगरसेवक उपस्थित असतात. आगोदरच्या तहकुब सभाही होत असतात, त्यामुळे महिन्यातून एक १ ते २ वेळा निश्चित सभागृहात त्यांची उपस्थिती असते. सभागृहात सावित्रीबाइ् फुले यांचे तैलचित्र लावलेले असताना, आणखी एक तैलचित्र लावण्याची प्रशासनाने तयारी केली. ही चूक वेळीच निदर्शनास आणून देण्याची
बाब वर्षभरात अनेकदा सभागृहास
भेट देणाऱ्या एकाच्याही लक्षात येऊ नये याबद्दल नागरिक आश्चर्य व्यकत करीत आहेत.
महापालिका सभागृहात लावलेल्या तैलचित्रांमध्ये आता दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचे तैलचित्र झळकणार आहे. राष्ट्रपुरूषांच्या तैलचित्रांसह माजी मुखयमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, उद्योनगरीचे शिल्पकार अण्णासाहेब मगर, दिवंगत शालेय शिक्षण मंत्री प्रा. रामकृष्ण मोरे या नेत्यांची तैलचित्रही लावण्यात आली आहेत. माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांचे तैलचित्र लावले आहे, त्याचबरोबर आता माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्याही तैलचित्राचे अनावरण होणार आहे. माजी उपमुखयमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत गुरूवारी २९ जानेवारीला दुपारी ३.१५ वाजता हा कार्यक़्रम होणार आहे. सभागृहात सावित्रीबाई फुले यांचे एक तैलचित्र असताना, आणखी एक तैलचित्र तयार करून घेतले आहे.
महापालिकेच्या सभागृहात क्रांतीसूर्य महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज,तसेच छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,लोकशाहिर अण्णाभाऊ साठे या राष्ट्रपुरूषांच्या तैलचित्रांसह यांचही तैलचित्र आहेत.
महापालिका सभागृहात लावलेली ही तैलचित्र छोट्या आकारातील नाहित. सुमारे पाच फुट उंच आणि तीन फुट रूंद आकाराची तैलचित्र सभागृहात समोरच लावलेली आहेत. समोरच लावलेली ही तैलचित्र चटकन नजरेस येतात. असे असताना, सभागृहात सावित्रीबाई फुले यांचे तैलचित्र असल्याचे कोणत्याच अधिकाऱ्याच्या लक्षात आले नाही. त्यांच्या चुकीमुळे तैलचित्र तयार करून घेण्यासाठी पुन्हा खर्च करावा लागला आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा गलथान कारभार यामुळे चव्हाट्यावर आला आहे. शिवाय महापालिकेच्या कारभाराबद्दल मोठ्या आवाजात टिका करणाऱ्या नगरसेवक, पदाधिकाऱ्यांच्यासुद्धा हा प्रकार लक्षात आला नाही. गुरूवारी तैलचित्र अनावरण समारंभ आहे, त्यामुळे नियोजनाचा भाग म्हणुन आदल्या दिवशी तैलचित्र कोठे लावायचे यासाठी सभागृहात फेरफटका मारणे गरजेचे होते. परंतू कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपवून बिनधास्त वरिष्ठ अधिकारी कोणी सभागृहाकडे फिरकले नाही. गुरूवारी अनावरण समारंभावेळीच ही परिस्थिती त्यांच्या निदर्शनास येणार आहे.
महापालिका प्रशासनाचा असा हा अजब कारभार किती दिवस सुरू राहाणार असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Savitribai again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.