शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

जोखीम पत्करून सावित्रीने वाचविले पतीचे प्राण; पत्नीच्या किडनी दानामुळे पतीला मिळाले जीवनदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 10:22 IST

किडनी प्रत्यारोपण करणे गरजेचे आहे, नाहीतर त्यांचे प्राण धोक्यात येतील, असे डॉक्टरांनी सांगितल्यावर कुटुंबासमोर अंधार निर्माण झाला. अशावेळी नातेवाइकांनीही तोंड फिरवले.

पुणे : भारतीय संस्कृतीत महत्त्वपूर्ण स्थान असलेल्या वटपौर्णिमेच्या सत्यवान-सावित्री कथेला जुळेल अशी घटना पुण्यातील हडपसर भागात राहणाऱ्या दाम्पत्याबरोबर घडली आहे. हिंगणे मळा परिसरात वास्तव्यास असलेल्या ५३ वर्षीय सत्यवानाला (नावात बदल) सावित्रीने स्वतःची किडनी देऊन जीवनदान दिले.सत्यवान यांना २०१५ मध्ये उच्च रक्तदाबामुळे दोन्ही किडन्या खराब झाल्याचे समजले. या घटनेने एका खासगी कंपनीत फिटर म्हणून काम करत असलेले सत्यवान व त्यांची ४३ वर्षीय पत्नी सावित्री (नावात बदल) यांच्यावर आभाळ कोसळले. कुटुंबाचा एकमेव कमावता आधार असलेले सत्यवान यांच्या समोर कुटुंबाच्या भविष्यातील उदरनिर्वाहाचा प्रश्न यक्ष म्हणून उभा ठकला. याच विवंचनेत त्यांची प्रकृती अधिकच खालावत चालली होती. अशावेळी त्यांची पत्नी सावित्री हिने खचून न जाता पतीच्या आजारावर उपचार करण्याचा निर्धार केला. शिक्षण घेत असलेल्या अनुक्रमे १७ व १५ वर्षांच्या दोन मुली व एक ३ वर्षांचा लहान मुलगा यांच्या पालन पोषणाची जबाबदारी उचलत फॉल, पिको व कपडे शिवण्याचे काम सुरू केले. मात्र, औषधोपचाराचा खर्च आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाह यांचा मेळ घालताना स्वतःच्या तब्येतीकडे कधीच पाहिले नसल्याचे त्या सांगतात.पतीची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालल्याने डॉक्टरांनी किडनी प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. तेव्हा खासगी रुग्णालयांमध्ये किडनी प्रत्यारोपणाबाबत विचारणा केली असता, त्यावेळी १० ते १२ लाख रुपयांचा खर्च सांगण्यात आला. हा खर्च सर्वसामान्य कोणत्याही कुटुंबाला परवडणारा नाही. त्यामुळे त्यांनी डायलिसिसचा पर्याय निवडला. अनेक वर्षे डायलिसिस व औषध उपचार यावर जीवनक्रम सुरू होता. त्याचाही दरमहा पाच ते सहा हजार रुपये खर्च सुरू झाला.

अनेक वर्ष हे सुरू राहिल्यानंतर एक दिवस चक्कर येऊन कोसळून पडलेले सत्यवान यांना रुग्णालयात दाखल केले असता, आता किडनी प्रत्यारोपण करणे गरजेचे आहे, नाहीतर त्यांचे प्राण धोक्यात येतील, असे डॉक्टरांनी सांगितल्यावर कुटुंबासमोर अंधार निर्माण झाला. अशावेळी नातेवाइकांनीही तोंड फिरवले. या वेळी कुठून तरी त्यांना ससून रुग्णालयातील उपचाराबाबत माहिती मिळाली. ससून रुग्णालयातील सामाजिक विभागात संपर्क केला असता, तेथील अधीक्षक व सह कर्मचाऱ्यांनी रक्तातील नात्यामधील व्यक्तीची एक किडनी रुग्णाला दिल्यास रुग्णाचे प्राण वाचू शकतील व किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा खर्चही कमी होईल, असे सांगितले. 

हा आशेचा किरण कुटुंबासमोर दिसताच रुग्णाच्या पत्नी सावित्री यांनी स्वतःच्या जिवाचा कोणताही विचार न करता जोखीम पत्करून स्वतःची एक किडनी पतीला देण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यानुसार ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता व किडनी प्रत्यारोपण समितीची मान्यता मिळताच किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची तयारी करण्यात आली. यासाठी पती-पत्नी दोघांच्याही तपासण्या करून ९ ऑक्टोबर २०२४ रोजी रुग्णावर यशस्वी किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. या घटनेला आज ९ महिने पूर्ण होत आहे.

रुग्ण पती व स्वतःची किडनी देणारी पत्नी सावित्री यांची प्रकृती स्थिर आहे. कुटुंबप्रमुख सत्यवान पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. ही शस्त्रक्रिया अवघ्या ४ ते ५ लाखांत झाल्याचे त्यांचे कुटुंबीय सांगतात. यातही ससून रुग्णालयाच्या सामाजिक विभागाने शासनाच्या विविध आरोग्य योजना व धर्मदाय संस्थांकडून मदत मिळून यातील अर्धा खर्च केला आहे. सत्यवान काम करत असलेल्या खासगी कंपनीनेही सहानुभूतीपूर्वक विचार करून १ लाखाची मदत शस्त्रक्रियेसाठी केली. आज त्यांची प्रकृती उत्तम असली, तरी त्यांच्यावरील औषध उपचाराचा दरमहा खर्च मोठा आहे. त्यांच्या दोन्ही मुली आता मोठ्या झाल्या असून, नुकत्याच त्यांनी खासगी नोकरी स्वीकारून कुटुंबाला हातभार लावत आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड