नवलेवाडीत सावित्री उत्सव साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:29 IST2021-01-08T04:29:38+5:302021-01-08T04:29:38+5:30
नवलेवाडीत घरोघरी गुढ्या उभारुन गावचे ग्रामदैवत कानिफनाथ मंदिरात सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून या ...

नवलेवाडीत सावित्री उत्सव साजरा
नवलेवाडीत घरोघरी गुढ्या उभारुन गावचे ग्रामदैवत कानिफनाथ मंदिरात सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून या उत्सवाला सुरुवात करण्यात आली. प्रत्येक घरी पुरण पोळीचा नैवेद्य करण्यात आला होता. संध्याकाळी मंदिरासमोरील पटांगणात शाळकरी मुलींनी सावित्रीबाईंची वेशभूषा करून छोट्या छोट्या नाटिकांद्वारे सावित्रीबाईंचा जीवनपट सांगण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमादरम्यान मुलींना जन्म देणाऱ्या मातांचा सत्कार करून खणा नारळाने ओटी भरण्यात आली. कोरोना महामारीच्या काळात गावात काम करणाऱ्या आशा व अंगणवाडी सेविकांचा कोविड योध्दा म्हणून सत्कार करण्यात आला.
रात्री रूपाली फरांदे व प्रा. संभाजी नवले यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सावित्रीबाईंच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगण्यात आले. गावाला ग्रामपंचायतीच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सावित्री उत्सव साजरा करण्यासाठी सरपंच कविता वाघोले, उपसरपंच धनंजय नवले, महिला समता परिषदेच्या अध्यक्षा नीलम होले, उपाध्यक्ष किसन वाघोले, प्रिया जगताप, चंद्रकांत वाघोले, नानासो वाघोले, मनीषा वाघोले, अर्चना नवले, दीपाली नवले, माजी सरपंच दत्ता भोंगळे, मुख्याध्यापिका अनिता वाघोले, तंटामुक्ती अध्यक्ष दुर्योधन भोंगळे, उत्तम नवले, बाळासाहेब नवले, दीपक भोंगळे यांनी अथक परिश्रम घेतले. आभार भारत वाघोले यांनी मानले.
नवलेवाडी (ता. पुरंदर) येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने सावित्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.