सव्वा लाखाचा गुटखा पकडला
By Admin | Updated: July 3, 2016 03:45 IST2016-07-03T03:45:26+5:302016-07-03T03:45:26+5:30
येथील पान दुकानात विक्रीसाठी आणलेला गुटखा पोलिसांनी कारवाई करून पकडला. या कारवाईत अंदाजे १ लाख ३८ हजार रुपयांचा गुटखा पकडला आहे. हा माल कोणाला विकण्यासाठी

सव्वा लाखाचा गुटखा पकडला
भिगवण : येथील पान दुकानात विक्रीसाठी आणलेला गुटखा पोलिसांनी कारवाई करून पकडला. या कारवाईत अंदाजे १ लाख ३८ हजार रुपयांचा गुटखा पकडला आहे. हा माल कोणाला विकण्यासाठी आणला होता, याची माहिती घेण्यात येत आहे.
तत्कालीन सरकारने तरुणांच्या हिताचा निर्णय घेऊन गुटखाबंदीचा कायदा आणला. हा कायदा आला, तरी त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने न झाल्याने मोठ्या प्रमाणावर चोरून गुटखा विकला जात आहे. आजच्या घडीला पान दुकानात गुटखा सापडणार नाही, असे दुकान विरळच. त्यामुळे बंदी नव्हती, त्या वेळच्या किमतीपेक्षा दुपटीने गुटख्याचे भाव वाढले. भिगवण येथे मोठ्या प्रमाणावर गुटखा विकला जातो. याची माहिती भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली. भिगवण पोलिसांनी केलेल्या कारवाईत भिगवण-राशीन रस्त्यावर स्कार्पिओ गाडीमध्ये १ लाख ३८ हजार रुपये किमतीचा गुटखा पकडला आहे. जप्त केलेला मुद्देमाल व आरोपी हे पुढील कारवाईसाठी पुणे येथील अन्नसुरक्षा अधिकारी एस. बी. अंकुश यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत.
या कारवाईत सी. एम. यादव यांच्यासोबत जालिंदर जगताप, रमेश भोसले, श्रीरंग शिंदे, अभिजित एकशिंगे, बापू हाडागळे या पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.