‘जीवनदायी’ने तारले
By Admin | Updated: February 2, 2015 02:33 IST2015-02-02T02:33:49+5:302015-02-02T02:33:49+5:30
राज्य शासनाची राजीव गांधी जीवनदायी योजना ससून रुग्णालयात सुरू करण्यात आल्याने गेल्या वर्षभरात तब्बल २ हजार ४०० जणांचे प्राण वाचले आहेत.

‘जीवनदायी’ने तारले
पुणे : राज्य शासनाची राजीव गांधी जीवनदायी योजना ससून रुग्णालयात सुरू करण्यात आल्याने गेल्या वर्षभरात तब्बल २ हजार ४०० जणांचे प्राण वाचले आहेत. या योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत उपचार करण्यात आल्याने गरीब रुग्णांना आधार मिळालेला आहे. यामध्ये सर्वाधिक उपचार हे अपघातग्रस्त, बालरोग आणि कर्करोग झालेल्या रुग्णांवर करण्यात आले आहेत.
ग्ािरबीत जीवन जगणाऱ्यांना एखादा आजार जडला तर त्यावर उपचार करण्यासाठी पैसेही नसतात. अशा रुग्णांना अत्याधुनिक उपचार मोफत देण्यासाठी राज्य शासनाने राजीव गांधी जीवनदायी योजना सुरू केली. ही योजना १ नोव्हेंबर २०१३ पासून ससून रुग्णालयात राबविण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून या योजनेअंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
याबाबत या योजनेच्या ससूनमधील प्रमुख डॉ. भारती दासवानी म्हणाल्या, ‘‘या योजनेअंतर्गत गरीब रुग्णांना मोफत उपचार देण्यासाठी ही योजना फायदेशीर ठरत आहे. ससूनमध्ये काही विशिष्ट आजारांमध्ये मोफत उपचार मिळत नव्हते. या जीवनदायी योजनेमुळे आता सर्व आजारांवर मोफत उपचार शक्य झाले आहेत. गेल्या १४ महिन्यांमध्ये तब्बल २ हजार ४०० रुग्णांवर या योजनेअंतर्गत उपचार करण्यात आले. यामध्ये सर्वाधिक उपचार हे अपघातग्रस्त-फ्रॅक्चर झालेले, बालरोगी, कर्करुग्णांवर करण्यात आले. ३०० अपघातग्रस्त रुग्णांवर, ३०० बालरोगींवर, ३०० कर्करोगींवर, २०० मूत्रपिंड आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांवर, २०० कान-नाक-घसा आजाराच्या रुग्णांवर या योजनेअंतर्गत उपचार करण्यात आले आहेत.’’
राज्य शासनाकडून ससूनला आतापर्यंत साडेपाच कोटी रुपये मिळाले आहेत, असे सांगताना डॉ. दासवानी म्हणाल्या, ‘‘आजही रेशनकार्ड नसल्याने या योजनेअंतर्गत उपचार मिळत नाहीत. ही योजना सुरू केली तेव्हा हे प्रमाण ८० टक्के होते. ते प्रमाण आता ५० टक्क्यांवर आले आहे.