शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गांधी हत्येशी सावरकरांचा दुरान्वये संबंध नाही : शेषराव मोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 13:45 IST

न्यायालयाचा निकाल लोकशाहीत अंतिम मानला जातो. असे असतानाही सावरकरांचे गांधी, नेहरू परिवार व काँग्रेसशी असलेले संबंध समजून न घेता त्यांच्या बदनामीची मोहिम अद्यापही का सुरू आहे? असा प्रश्न पडतो.

ठळक मुद्देसावरकरांची भूमिका गांधी अथवा काँग्रेसविरोधी नव्हती हे अनेक पत्रातून स्पष्टमृत्यूनंतरही स्वातंत्र्यवीरांची होत असलेली बदनामी माझ्या मनाला पटत नाही.

पुणे : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या विचारात राष्ट्रभक्ती व राष्ट्रहित होते. हे आपण कधी समजून घेणार आहोत की नाही? सावकरांच्या विचारात देशभक्ती असेल, तर महात्मा गांधी यांच्या सारख्या व्यक्तीची हत्या करून स्वत:ला कलंकित करण्याची त्यांना इच्छा होती का? गांधीजींच्या विचारांचे समर्थन करणारे सावरकर गांधी हत्याकांडात सहभागी तरी होतील का? महात्मा गांधी हत्या प्रकरणात सावरकरांचा दुरान्वये देखील संबंध नव्हता. न्यायालयातही तेच सिद्ध झाले. त्यामुळेच त्यांची निर्दोष मुक्तता झाली. मात्र सावरकरांची अव्याहत बदनामी सुरू ठेवणाऱ्यांना आणखी कोणते पुरावे द्यावेत? असा खडा सवाल ज्येष्ठ विचारवंत प्रा. शेषराव मोरे यांनी मंगळवारी सावरकर विरोधकांसमोर उपस्थित केला. वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे टिळक स्मारक मंदिरात आयोजित वसंत व्याख्यानमालेच्या १४४ व्या ज्ञानसत्रात प्रा. मोरे यांनी चौथे पुष्प गुंफले. कै. म.म.दत्तो वामन पोतदार स्मृती व्याख्यानात ‘गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी’ या विषयावर त्यांनी विचार व्यक्त केले.     न्यायालयाचा निकाल लोकशाहीत अंतिम मानला जातो. असे असतानाही सावरकर- गांधी, सावरकर-नेहरू, सावरकर-कॉँग्रेस संबंध न समजून घेता सावरकरांच्या बदनामीची मोहिम अद्यापही का सुरू आहे? असा प्रश्न उपस्थित करीत प्रा. मोरे म्हणाले, सावरकरांची भूमिका गांधी अथवा काँग्रेसविरोधी नव्हती, तर समर्थनाची होती. हे सावरकरांच्या अनेक पत्रातून स्पष्ट होते. गांधी हत्याकांडात सावकरांचा सहभाग होता अशी एकमेव साक्ष दिगंबर बडगे यांनी दिली होती. त्यात अनेक तफावती आहेत. कपूर आयोगानेही गांधी हत्येसंदर्भात जे निष्कर्ष काढले आहेत ते निराधार व बेकायदेशीर आहेत. कारण बडगे हे एकमेव साक्षीदार असताना कपूर आयोगाने एकदाही बडगे यांची साक्ष घेतली नाही. ही गोष्ट गंभीर आहे. सावरकरांची गांधीजींविषयीची भूमिका, न्यायालयात सादर झालेले पुरावे, तर्क वितर्क आदी सर्व बाबींचा विचार करता गांधी हत्येत सावकरांचा दुरान्वये संबंध नव्हता हेच सिद्ध होते. त्यामुळेच मृत्यूनंतरही स्वातंत्र्यवीरांची होत असलेली बदनामी माझ्या मनाला पटली नाही. सावरकरांच्या बदनामीच्या मोहिमेत सत्यता नाही म्हणून सावरकरांची खरी बाजू पुस्तकांच्या माध्यमातून समोर आणण्याचा प्रयत्न केला. 

टॅग्स :PuneपुणेMahatma Gandhiमहात्मा गांधीVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकर