सतारवादक श्रीनिवास केसकर यांचे निधन
By Admin | Updated: February 15, 2017 02:26 IST2017-02-15T02:26:49+5:302017-02-15T02:26:49+5:30
प्रसिध्द सतारवादक आणि संगीतकार पं. श्रीनिवास केसकर यांचे सोमवारी (दि. १३) प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते.

सतारवादक श्रीनिवास केसकर यांचे निधन
पुणे : प्रसिध्द सतारवादक आणि संगीतकार पं. श्रीनिवास केसकर यांचे सोमवारी (दि. १३) प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात ३ मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
केसकर यांनी १९५५ सालापासून सतारवादनाच्या अनेक स्वतंत्र मैैफिली केल्या. संगीतकार सुधीर फडके, राम कदम, प्रभाकर जोग, वसंत पवार अशा अनेक नामवंत संगीतकारांबरोबर त्यांनी चित्रपटांसाठी सतारवादन केले. पुणे आकाशवाणीवरही त्यांचे कार्यक्रम झाले.
सुरेश वाडकर, अनुराधा मराठे, वीणा सहस्त्रबुध्दे, उत्तरा केळकर अशा अनेक गायकांनी त्यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गीते गायली. १९८२ ते १९९५ या काळात त्यांनी आकाशवाणीवर संगीत दिग्दर्शक म्हणून काम केले. (प्रतिनिधी)