नीरेत शनिवार ठरला शुकशुकाटवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:12 IST2021-04-11T04:12:05+5:302021-04-11T04:12:05+5:30
शनिवारी सर्व दुकाने बंद ठेवत व्यावसायिकांनी घरात बसणे पसंद केले. तर नागरिक ही विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसले नाहीत. नीरा ...

नीरेत शनिवार ठरला शुकशुकाटवार
शनिवारी सर्व दुकाने बंद ठेवत व्यावसायिकांनी घरात बसणे पसंद केले. तर नागरिक ही विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसले नाहीत.
नीरा शहरामध्ये गुळूंचे, कर्नलवाडी, राख, थोपटेवाडी, पिंपरे (खुर्द), जेऊर, मांडकी ही पुरंदर तालुक्यातील गावे त्याचबरोबर बारामती तालुक्यातील निंबुत, खंडोबाची वाडी, गरदवाडी, तर सातारा जिल्ह्यातील पाडेगाव, बाळू पाटलाचीवाडी, पाडेगाव फार्म, रावडी, पिंपरे (बुद्रुक), या गावातील लोकांचा नेहमीच राबता असतो. त्यामुळे नीरा शहरात नेहमीच गर्दी पाहायला मिळते. मात्र आज लाॅकडाऊनला प्रतिसाद दिल्याने नीरेतील रस्त्यांवर आज शुकशुकाट पाहायला मिळाला. एक विशेष म्हणजे या लाॅकडाऊनसाठी पोलिसांना लोकांवर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकण्याची वेळ आली नाही. वीकएन्ड लाॅकडाऊनची पाहणी करण्यासाठी जेजुरी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक दुपारच्या वेळेत नीरेत दाखल झाले होते. त्यांनी नीरा शहरातून चक्कर मारून परिस्थितीची पाहणी केली.
फोटोओळ : वीकएन्ड लॉकडाऊनमुळे रस्ते ओस पडले तर लसीकरणाला उतस्फूर्त प्रतिसाद.
--
२२० जणांनी घेतली लस
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्रात २२० लोकांनी स्वयंस्फूर्तीने कोरोना प्रतिबंधित लस घेत लसीकरणाला उतस्फूर्त प्रतिसाद दिला. एकाच दिवशी इतक्या लोकांनी लसीकरण करुन घेतल्याचे हे महिनाभरातील रेकॉर्ड ब्रेक लसीकरण ठरले आहे.