पुणे : शहरात शनिवारी १९९ कोरोनाबाधित आढळून आले असून, ३९९ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज विविध तपासणी केंद्रांवर १० हजार ९४ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी १.९७ टक्के इतकी आढळून आली आहे.
शहरातील सक्रिय रूग्ण संख्या २ हजार ३११ इतकी आहे. आज दिवसभरात १० जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ५ जण हे पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील आजचा मृत्यूदर हा १.८० टक्के इतका आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही २०७ इतकी असून, आॅक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २९१ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत ३१ लाख ७२ हजार ५६ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ९६ हजार ५४३ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ८५ हजार २८७ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ९४५ जणांचा मृत्यू झाला आहे.