शनिवारी १७५ कोरोनाबाधित : २५३ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:11 IST2021-09-19T04:11:26+5:302021-09-19T04:11:26+5:30
पुणे : शहरात शनिवारी १७५ कोरोनाबाधित आढळून आले असून, २५३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर ७ ...

शनिवारी १७५ कोरोनाबाधित : २५३ कोरोनामुक्त
पुणे : शहरात शनिवारी १७५ कोरोनाबाधित आढळून आले असून, २५३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर ७ हजार ८९१ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २.२१ टक्के इतकी आढळून आली आहे.
शहरातील सक्रिय रुग्णसंख्या आजमितीला १ हजार ७८१ सक्रिय रुग्ण आहेत, तर दिवसभरात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी २ जण हे पुण्याबाहेरील आहे. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.८० टक्के इतका आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्णसंख्या ही १७६ इतकी असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २९१ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत ३२ लाख ७८ हजार ५५९ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ९९ हजार २२८ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ८८ हजार ४५० जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ९९७ जणांचा मृत्यू झाला आहे.
--------------