सासवडचे शिवतीर्थ छत्रपती शिवरायांच्या घोषणांनी दुमदुमले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:20 IST2021-02-21T04:20:51+5:302021-02-21T04:20:51+5:30
सासवडच्या शिवतीर्थावर आमदार संजय जगताप यांच्या उपस्थितीत अनेक युवकांनी शिवरायांचा जयघोष करीत परिसर दणाणून सोडला. शिवतीर्थावर तालुका काँग्रेसच्या वतीने ...

सासवडचे शिवतीर्थ छत्रपती शिवरायांच्या घोषणांनी दुमदुमले
सासवडच्या शिवतीर्थावर आमदार संजय जगताप यांच्या उपस्थितीत अनेक युवकांनी शिवरायांचा जयघोष करीत परिसर दणाणून सोडला.
शिवतीर्थावर तालुका काँग्रेसच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. आमदार संजय जगताप यांनी शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन केले. याप्रसंगी पुरंदर किल्ल्यावरून युवकांनी आणलेली शिवज्योत, शिवरायांचा पाळणा, कोरोना योद्धांचा जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कोल्हापूर येथील युवकांचे मर्दानी खेळांचे प्रदर्शन आदी विविध उपक्रमांनी हा उत्सव साजरा करण्यात आला.
दरम्यान गुरूवारी रात्रीपासूनच पुरंदर किल्ल्याचा रस्ता गजबजला होता. जिल्ह्यातील विविध गावांतील हजारो युवकांनी ज्योत आणण्यासाठी पुरंदर किल्ल्यावर गर्दी केली होती. भगवे झेंडे लावून हजारो दुचाकी रात्रभर रस्त्यावरून फिरत होत्या. चौकाचौकात मोठमोठाले भगवे झेंडे, ध्वनीक्षेपकावरील पोवाडे यांमुळे संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते. लहान मुलाांच्या शिवजयंती उत्सव मंडळानेे शिवतीर्थावरील शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यापासून शिवरायांच्या मूर्तीच्या काढलेल्या मिरवणुका आदी उपक्रमांनी झालेल्या उत्साही वातावरणात शिवजयंती साजरी झाली. याप्रसंगी नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, गटनेत्या आनंदीकाकी जगताप, उपनगराध्यक्षा निर्मला जगताप, जि प सदस्य दत्ता झुरंगे, पं स सदस्या सुनीता कोलते, सोनाली यादव, प्रदीप पोमण यांसह सर्व पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका यांनी उपस्थित पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सासवड येथील वाघिरे महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील आधारित ऑनलाइन प्रश्नमंजूषाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे करण्यात आले. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.सुषमा भोसले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. बाळासाहेब काळे, प्रा. सोपान नाळे , प्रा. संजय लांडगे प्रा.अनिल झोळ, प्रा. समीर कुंभारकर , प्रा.भानुदास गायकवाड, एम. जी. जगताप, वाघमोडे सर, व विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाला कार्यालयीन कर्मचारी नितीन शिवरकर आणि संतोष लोणकर यांचे सहकार्य लाभले.
- सासवड येथे शिवजयंती साजरी करण्यात आली.