सासवडचे पदपथ होणार प्रकाशमान
By Admin | Updated: June 6, 2015 22:14 IST2015-06-06T22:14:02+5:302015-06-06T22:14:02+5:30
नगर परिषदेतर्फे पदपथांवर एलईडी दिवे बसविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे सर्व पदपथ रात्री प्रकाशमान होणार आहे. याबरोबरच विजेचीही बचत होणार आहे.

सासवडचे पदपथ होणार प्रकाशमान
सासवड : नगर परिषदेतर्फे पदपथांवर एलईडी दिवे बसविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे सर्व पदपथ रात्री प्रकाशमान होणार आहे. याबरोबरच विजेचीही बचत होणार आहे.
हिवरे रोड चौक येथे नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप यांच्या हस्ते कामाला सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण विकास योजनेंतर्गत अनुदानातून हे काम करण्यात येत आहे. सासवड शहरातील एकूण १५४ खांबांवर
२३७ एलईडी दिवे बसविण्यात येतील. यामुळे ८० टक्के विजेची बचत होणार आहे.
शहरातील हिवरे रोड ते सोपानदेव मंदिर, तहसील कचेरी ते भैरवनाथ आखाडा, कमलेश्वर घाट ते मामलेदार कचेरी, जेजुरी नाका ते कमलेश्वर घाट, नाचण दुकान ते हिवरे रोड, सोपाननगर पाण्याची टाकी ते नाचण दुकान, छत्रपती शिवाजीमहाराज पुतळा ते नवप्रकाश चौक, पाणीपुरवठा केंद्र ते आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनासमोरील
रस्ता, एसटी स्थानक ते पालखी तळ, वीर बाजी पासलकर शाळा परिसर (दळवी आळी) या ठिकाणी असणाऱ्या भूमिगत केबलवर असणाऱ्या खांबावरील दिवे बदलून एलईडी दिवे बसविण्यास सुरुवात झाली आहे.
या कामासाठी अंदाजे ५७ लाख ६३ हजार रुपये एवढा खर्च येणार आहे. एका महिन्यात हे काम पूर्ण होणार आहे. या वेळी नगरसेवक अजित जगताप, मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास, विद्युत विभाग प्रमुख प्रवीण जगताप, प्रकाश जगताप, नाना जगताप, दीपक जगताप, कैलास जगताप, बबन जगताप,
नगरपालिका कार्यालयीन अधीक्षक प्रमिला सरोदे, आरोग्य प्रमुख मोहन चव्हाण, कर निरीक्षक रंजना दुगार्डे, लेखा अधिकारी किरण हेंद्रे, अनिल जगताप, पाणीपुरवठा अभियंता कळसकर यांसह सासवडचे नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)