सासवडला कोरोनाच्या सावटाखाली हनुमान जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:11 IST2021-04-28T04:11:27+5:302021-04-28T04:11:27+5:30

सासवड येथील पुरातन अशा दक्षिणमुखी मारुती मंदिरात भल्या पहाटे जन्मोत्सव साजरा करण्यात आला. कमलाकर क्षीरसागर यांच्या पौराेहित्याखाली व ...

Saswadla celebrates Hanuman Jayanti under the corona | सासवडला कोरोनाच्या सावटाखाली हनुमान जयंती साजरी

सासवडला कोरोनाच्या सावटाखाली हनुमान जयंती साजरी

सासवड येथील पुरातन अशा दक्षिणमुखी मारुती मंदिरात भल्या पहाटे जन्मोत्सव साजरा करण्यात आला. कमलाकर क्षीरसागर यांच्या पौराेहित्याखाली व पुजारी प्रमोद भैरवरकर यांच्या उपस्थितीत उत्सवमूर्तीला अभिषेक, पूजा, धार्मिक विधी झाले. त्यानंतर महाआरती झाली. संजय शेटे यांच्या संत सोपानकाका ताल मंचच्या विविध वाद्यांनी व मंदिरातील घंटानादाने काही काळ वातावरण भक्तिमय होऊन गेले होते. मंदिराला फुलांची तसेच विद्युत रोषणाईची आकर्षक सजावट करण्यात आली होती. मोजक्या उपस्थित भाविकांना सुंठवडा वाटण्यात आला.

सासवडच्या मानाच्या कावडीचे कैलासबुवा कावडे, ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरातील बापू गिरी गोसावी, जयवंत तथा भाऊ जगताप, बाजीराव जगताप (पाटील) महेश जगताप, उत्तम एक्के, आरोग्य अधिकारी मोहन चव्हाण, शैलेश जगताप आदी मोजके भाविक या वेळी हजर होत. सासवडच्या वाघ डोंगरावरील मारुती मंदिरातही काही थोडक्या भाविकांच्या उपस्थितीत जन्मसोहळा पार पडला.

Web Title: Saswadla celebrates Hanuman Jayanti under the corona