शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे! भारतात नव्हे तर जगात चंद्रपूर शहर ठरले सर्वात उष्ण; एप्रिलमध्येच पारा ४५.६ अंश
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ एप्रिल २०२५: कोणत्याही कामात यश मिळेल, आर्थिक फायदा होईल
3
अधिकारांत हस्तक्षेप करीत असल्याचे आमच्यावर आरोप; न्या. भूषण गवई यांनी नोंदवले निरीक्षण
4
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजसमोर जवाहरलाल दर्डा यांचा पुतळा; आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार अनावरण
5
GST सह सोन्याचा दर पोहचला १,००,००० प्रति तोळा; ग्राहकांना २० टक्के परतावा
6
रस्ते काँक्रिटीकरणामुळे खड्डे भरण्याच्या खर्चात १४० कोटींची घट; यंदा ७९ कोटींचीच निविदा
7
धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं निधन; भारतात २२ ते २४ एप्रिल असा ३ दिवस राष्ट्रीय दुखवटा
8
अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी नवी मुंबई पोलिस दलातील तपास अधिकाऱ्यांवर ताशेरे
9
विमानतळावर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना नाहक त्रास नको; हायकोर्टाने कंपन्यांना फटकारले
10
कुजबुज! ठाकरे बंधूंना टक्कर देण्यासाठी शिंदे ब्रँडचेही सोशल मीडियावर ब्रँडिंग सुरू
11
प्रेमसंबंध, हत्या अन् मृतदेहाचे तुकडे; तांत्रिक पुराव्यामुळे फुटले अभय कुरुंदकरचे बिंग
12
क्रांतिकारी मेंढपाळ गेला! अत्यंत मृदू आणि अतूट श्रद्धेचा एक स्वर कायमचा शांत झाला
13
चॅटजीपीटीचा वापर करून २ बहिणींनी केली कमाल; वाचवले तब्बल १० हजार डॉलर्स
14
‘पॉवर’ दाखवा, पृथ्वीला मूठभर अब्जाधीशांच्या आर्थिक दादागिरीतून सोडवा!
15
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
16
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

सासवड भारतात एक नंबरचे शहर करणार - संजय जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 02:26 IST

सर्वांच्या सहकार्याने सासवड शहराची सुधारणा करीत आहोत. केंद्र व राज्य शासनानेही कामांची दखल घेतली आहे. भविष्यात भारतातील एक नंबरचे सुंदर व सुरक्षित शहर करू, अशी ग्वाही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी नगरपालिकेच्या १५० व्या वर्धापनदिनी दिली.

सासवड - सर्वांच्या सहकार्याने सासवड शहराची सुधारणा करीत आहोत. केंद्र व राज्य शासनानेही कामांची दखल घेतली आहे. भविष्यात भारतातील एक नंबरचे सुंदर व सुरक्षित शहर करू, अशी ग्वाही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी नगरपालिकेच्या १५० व्या वर्धापनदिनी दिली.वर्धापनदिनानिमित्त नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत आयोजिलेल्या स्वच्छ शाळा, स्वच्छ हॉस्पिटल, स्वच्छ सोसायटी, स्वच्छ दुकाने या स्पर्धेचे बक्षीस वितरण जगताप यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मार्तंड भोंडे होते. मुख्याधिकारी विनोद जळक यांनी प्रास्ताविक केले.नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात घेतलेल्या स्पर्धेत यशस्वी झालेल्यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देण्यात आले. यामध्ये चिंतामणी हॉस्पिटल, माने हॉस्पिटल, किºहा स्वाद हॉटेल, सहारा सिल्व्हर सोसायटी, वीर बाजी पासलकर शाळा, संत नामदेव विद्यालय, श्रद्धा मेडिकल स्टोअर्स, शेती उद्योग भांडार यांचा गौरव करण्यात आला. घंटागाडी सेवक यांनाही प्रमाणपत्र देण्यात आले. नगरसेवकांच्या वतीने ‘डस्टबिन’ वाटप करण्यात आले.राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त तनिष्का कोकरे हिने सर्वांना स्वच्छतेची शपथ दिली. नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती यशवंत जगताप, शेतकरी संघटनेचे दिलीप गिरमे, नियोजन मंडळाचे सदस्य गिरीश जगताप, नगरसेवक संजयअण्णा जगताप, साळवी, शशिकांत काकडे यांनी मनोगत व्यक्त केले. संजय पवार, राजिवडे यांनी सूत्रसंचालन केले. सुहास लांडगे यांनी आभार मानले.या वेळी माजी नगराध्यक्ष बापूसाहेब नानासाहेब जगताप, दत्तानाना जगताप, रामभाऊ वढणे, संतोष जगताप, संतोष गिरमे यांच्यासह उपनगराध्यक्ष विजय वढणे, नगरसेवक अजित जगताप, प्रवीण भोंडे, सचिन भोंगळे, गणेश जगताप, दिनेश भिंताडे, नगरसेविका मंगल म्हेत्रे, वसुधा आनंदे, डॉ. अस्मिता रणपिसे, विद्या टिळेकर, सारिका हिवरकर, नगरपालिका कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.नागरिकांना मोफत वाय-फाय सुविधा, मीटरने पाणी, सुशोभीकरण अशी कामे करणारी सासवड ही एकमेव नगरपालिका आहे. सध्या सर्वत्र प्रदूषणाचा त्रास होत आहे. प्रदूषण वाढू नये, म्हणून ‘इ-रिक्षा’ सुरू करणार असल्याचे यावेळी संजय जगताप यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणे