सासवड कृषी प्रदर्शनाच्या हिशेबासाठी सदस्यांचे उपोषण

By Admin | Updated: March 20, 2015 23:07 IST2015-03-20T23:07:43+5:302015-03-20T23:07:43+5:30

पुरंदर तालुक्यात सासवड येथे झालेल्या कृषी आणि पशुसंवर्धनच्या प्रदर्शनात मोठा गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप करीत त्याचे आॅडिट करा,

Saswad Farmers 'Festivals' Festivals | सासवड कृषी प्रदर्शनाच्या हिशेबासाठी सदस्यांचे उपोषण

सासवड कृषी प्रदर्शनाच्या हिशेबासाठी सदस्यांचे उपोषण

पुणे : पुरंदर तालुक्यात सासवड येथे झालेल्या कृषी आणि पशुसंवर्धनच्या प्रदर्शनात मोठा गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप करीत त्याचे आॅडिट करा, अशी मागणी करीत शुक्रवारी सर्वसाधारण सभेपूर्वी सर्व विरोधीपक्ष सदस्य जिल्हा परिषदेच्या गेटवर उपोषणाला बसले. प्रदर्शनाच्या निधीचा भ्रष्टाचार करणा-यांवर कारवाई केल्याशिवाय उपोषण मागे न घेण्याचा पवीत्रा सदस्यांनी घेतला. यावर अध्यक्ष प्रदीप कंद यांनी स्व:ता सदस्यांनी मनधारणा करुन संबंधित प्रकरणाची चौकशी करुन एका महिन्याचा आता अहवाल सादर करण्याचे अश्वासन दिले.
जिल्हा परिषतर्फे भरविण्यात येणारे कृषी व पशु प्रदर्शन यंदा पुरंदर तालुक्यात सासवड येथे भरविण्यात आले होते. या प्रदर्शनात सुमारे ४५० स्टॉल लावण्यात आले होते. प्रदर्शनासाठी एकूण सुमारे १७ लाखांचा खर्च झाल्याचे दाखविण्यात आले. यासाठी कृषी विभागातर्फे ३ लाख, पशु संवर्धन विभागाने १०, तर पुणे जिल्हा बँकेतर्फे २ लाख रुपये देण्यात आले होते. तसेच प्रदर्शनाताली प्रत्येक स्टॉलकडून १५ हजार रुपये वसूल करण्याता आल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे . या सर्व रकमेचे आॅडिट करा, अशी मागणी करत सर्व विरोधी पक्ष सदस्यांनी उपोषण केले. यामध्ये जिल्हा परिषदेच्या विरोधी पक्ष नेत्या आशा बुचके, कॉग्रेसच्या गटनेत्या ऋतुजा पाटील, स्वाती टकले, माऊली खंडागळे,नयना डोके, कुलदीप कोंडे यांच्यासह मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबाराजे जाधव उपस्थित होते.

Web Title: Saswad Farmers 'Festivals' Festivals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.