शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सासवड शहराचा पाणीपुरवठा अडकला राजकीय साठमारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 14:33 IST

सासवड शहरातील ६० हजार नागरिकांना रोज सुमारे ६० लाख लिटर पाणी लागते...

ठळक मुद्देसासवडला गेले तीन दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई पाणी विकत घेण्याची नागरिकांवर वेळ 

सासवड : वीर धरणातून नीरा डाव्या कालव्याचे आवर्तन २६ मेपर्यंत चालू राहिल्याने वीर धरणातील पाणीपातळी मृत साठ्याच्याही खाली गेल्याने सासवड शहराच्या पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेलमध्ये पाणी येणे पूर्णपणे बंद झाले. त्यामुळे अतिशय आतील बाजूला असलेल्या जुन्या धरणामध्ये तात्पुरते दोन वीजपंंप लावून जॅकवेलमध्ये पाणी घेण्याची सासवड नगरपालिकेची कसरत सुरू असून, त्यातून सासवड शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला असून, नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. सासवड शहरातील ६० हजार नागरिकांना रोज सुमारे ६० लाख लिटर पाणी लागते. शहराला पाणीपुरवठा करणारे सिद्धेश्वर, गराडे, घोरवडी धरणांतील पाण्याचा स्रोत आटल्याने आता पिण्याच्या पाण्यासाठी वीर योजनेचा स्रोत आहे. त्यातून पदाधिकारी यांनी पाटबंधारे विभाग व जिल्हाधिकारी यांना भेटून याबाबत निवेदन दिले होते. तरीही आचारसंहितेचे कारण देऊन सदर प्रश्न प्रलंबित ठेवल्याने व जलसंपदा (नियोजन) विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने सासवड शहरातील नागरिकांचे अडचणीत वाढ झाली. जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे या खात्याचे मंत्री असून याबाबतचे नियोजन त्यांच्या खात्याकडे आहे. वास्तविक निरा डावा कालव्यास आवर्तन १५ दिवस जादा सोडल्याने धरणातील पाणी पातळी वेगाने कमी होत गेली. यावर सासवड नगरपरिषदेने मा. जिल्हाधिकारी यांचेकडे पाठपुरावा केल्याने दि २६ मे रोजी नीरा डावा कालव्याचे ऊन्हाळी आवर्तन बंद केले. त्यानंतर दोन दिवसात शहराचा पाणीपुरवठा पाणी पातळी खाली गेल्याने विस्कळीत झाला यावर सोशल मीडिया व नागरिकांनी जाहीर नाराजी व्यक्त केल्याने राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी गुंजवणी धरणातून अर्धा टीएमसी पाणी वीर धरणात सोडण्याचे आदेश देण्यात आले. परंतु, हे पाणी वीर धरणात किती क्षमतेने पोहोचेल व किती टीएमसी पाणी धरणात येईल याविषयी शंकाच आहे..............................४राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या आदेशानुसार वीर धरणाचा डावा कालवा बंद करण्याबाबत व अर्धा टीएमसी गुंजवणी धरणातील  पाणी  २३० क्युसेक्स वेगाने  वीर धरणात सोडण्याचे आदेश दिले खरे; परंतु गुंजवणी धरणातून सोडलेले पाणी प्रत्यक्ष वीर धरणात किती पोहोचणार? तसेच हे पाणी सासवड शहरासाठी राखीव आहे का ? कारण वीर धरणावरून अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना कार्यन्वित आहेत. त्यामुळे हे पाणी पूर्ण क्षमतेने सासवडला मिळेल का? याविषयी गंभीर साशंकता सासवडच्या नागरिकांमध्ये आहे.

................

* सासवडचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे व उपनगराध्यक्ष व पाणीपुरवठा सभापती संजय ग. जगताप तसेच सासवडचे नगरपरिषद पाणीपुरवठा विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. पाटबंधारे विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनदेखील ही कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे यांनी सांगितले. तसेच पाणी जपून वापरण्याचे आवाहन देखील त्यांनी या वेळी केले..........

टॅग्स :PuneपुणेWaterपाणी