शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या मुकाबल्यासाठी ससून रुग्णालयाला ५ कोटींचा निधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 19:57 IST

४० व्हेंटिलेटरसह अतिदक्षता कक्ष सुरू करणार

ठळक मुद्देजिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी तातडीने निधी दिला

पुणे : शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नायडू रुग्णालयातील व्यवस्था भविष्यात कमी पडू शकते. यामुळे ससून रुग्णालयामध्ये नवीन इमारतीमध्ये सातव्या मजल्यावर तब्बल ४० व्हेंटिलेटरसह अत्यंत अद्ययावत असा अतिदक्षता कक्ष सुरू करण्यात येणार असल्याचे ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.  अजय चंदनवाले यांनी सांगितले. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ससून रुग्णालयाला तातडीने ५ कोटी रुपयांचा निधी दिल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. गेल्या आठ-दहा दिवसांत पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १६ वर जाऊन पोहोचली आहे. सध्या पुणे शहरामध्ये नायडू रुग्णालय आणि पिंपरी-चिंचवड येथे यशवंतराव चव्हाण रुग्णालयामध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. परंतु रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता भविष्यात ही व्यवस्था कमी पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली असून, सरकारी रुग्णालयासह शहर आणि जिल्ह्यातील काही प्रमुख खासगी रुग्णालयांनादेखील कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी स्वंतत्र अतिदक्षता कक्ष तयार ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुण्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे असलेल्या ससून रुग्णालयामध्ये कोरोनाबाधित रुग्णावर उपाचर करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू करण्यात येत आहेत. कोरोना विषाणूची लागण हे सध्या राष्ट्रीय संकट असून, याचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येईल. त्यासाठी आवश्यक असलेला निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे सांगत अर्थमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीमधून कोरोनासाठी आवश्यक निधी खर्च करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकाºयांना दिल्याचे नुकतेच स्पष्ट केलेहोते. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी रविवारी ससून रुग्णालय व अन्य आरोग्य विभागाच्या अधिकाºयांची बैठक घेतली. यावेळी डॉ. अजय चंदनवाले उपस्थित होते. या बैठकीमध्ये सध्या अस्तित्वात असलेली व्यवस्था व भविष्यात निर्माण करावी लागणारी व्यवस्था याचा आढावा घेण्यात आला. सध्या नायडू रुग्णालयामध्ये केवळ तीन व्हेंटिलेटर असून, अद्याप कोरोनाबाधित सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याने व्हेंटिलेटरची आवश्यकता भासणार नाही. यामुळे येत्या काही दिवसांत ससून रुग्णालयामध्ये ४० व्हेंटिलेटरसह अन्य सर्व सोयी-सुविधांयुक्त असा अतिदक्षता कक्ष सुरू करण्यात येणार असल्याचे डॉ. चंदनवाले यांनी सांगितले.                     ०००                    

टॅग्स :Puneपुणेsasoon hospitalससून हॉस्पिटलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavalkishor Ramनवलकिशोर राम