शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

जिल्ह्यात सरपंच आरक्षणामुळे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची तीव्रता झाली कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2020 13:18 IST

जिल्ह्यात सरपंच आरक्षणावर संमिश्र प्रतिक्रिया

पुणे : पुणे जिल्ह्यातील 748 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. परंतु शासनाने पुणे जिल्ह्यातील निश्चित झालेले सरपंच पदाचे आरक्षण देखील रद्द करून निवडणुकीनंतर नव्याने आरक्षण जाहीर केले जाईल असे स्पष्ट केले. परंतु निवडणुकीनंतर सरपंच पदाचे आरक्षण निश्चित होणार असल्याने अनेक ठिकाणी लोक आरक्षणासाठी न्यायालयात जातील व सरपंच पद रिक्त राहण्याचे प्रमाण वाढणार आहे. शासनाच्या या निर्णयाबाबत जिल्ह्यातील सरपंचामध्ये संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

कोरोना आणि लाॅकडाऊनमुळे रखडलेल्या सर्व मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. यासाठी येत्या 15 जानेवारी 2021 मतदान होणार आहे. परंतु राज्य शासनाने आता संपूर्ण राज्यात सरपंच पदाची आरक्षण सोडत निवडणुका जाहीर झाल्यानंतर काढण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्यात सरपंच पदाचे आरक्षण निश्चित देखील झाले होते, पण आता पुन्हा नव्याने हे आरक्षण काढण्यात येणार आहे.--------निवडणुकीतील तीव्रता कमी झाली सरपंच पद निवडणुकी पूर्वी निश्चित झाले असल्यास सरपंच पदाचा उमेदवार संपूर्ण पॅनल निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतो, खर्च करतो, पण आता आरक्षण कोणासाठी निघेल हेच निश्चित नसल्याने निवडणुकीतील तीव्रता कमी झाली आहे. याचा परिणाम निवडणुकीनंतर दिसून येईल, सरपंच पदासाठी मोठा घोडेबाजार देखील होऊ शकतो.- संदीप लिंबूरे, माजी सरपंच,  हिवरे, पुरंदर ------ग्रामपंचायत निवडणूक सरपंच केंद्रीत होतेनिवडणुकीपूर्वी सरपंच पद निश्चित झाल्यानंतर त्या गावाची संपूर्ण निवडणूक ही सरपंच केंद्रीत होते. संपूर्ण राजकारण त्या पदा भोवतीच फिरत राहते. परंतु आता निवडणुकीनंतर सरपंच पद निश्चित होणार असल्याने सर्वच उमेदवार त्याच ताकदीने निवडणूक लढतील.- पुष्पा कोरडे, माजी सरपंच बोरी, जुन्नर ------सरपंच पदाचे आरक्षण निवडणुकीनंतर होणार असल्याने, तातडीने होवू शकणारी सरपंच निवड लांबणीवर पडणार असून, या आरक्षणावरून हरकती किंवा कोर्टात अपील दाखल झाल्यास सरपंच पद अनेक दिवस रिक्त राहू शकते.  याशिवाय ग्रामपंचायतीमध्ये ज्या आरक्षणातून सदस्य निवडून आले त्याच आरक्षणाचे सरपंचपद आरक्षण द्यावे लागेल.  हे आरक्षण काढताना निवडणुकीचा निकाल पाहून त्यात राजकीय हस्तक्षेप यासंदर्भात शंका निर्माण होऊ शकतात.- शरद बुट्टे पाटील, जिल्हा परिषद सदस्य

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायतcorona virusकोरोना वायरस बातम्याsarpanchसरपंच