आंबेगाव गावठाणचे सरपंच आरक्षण अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:27 IST2020-12-12T04:27:48+5:302020-12-12T04:27:48+5:30
या ग्रामपंचायत मध्ये दरवर्षी पेसा निधी येतो तसेच सदर शासन निर्णयामध्ये आंबेगाव या गावाची आंबेगाव गावठाण ही ...

आंबेगाव गावठाणचे सरपंच आरक्षण अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवावे
या ग्रामपंचायत मध्ये दरवर्षी पेसा निधी येतो तसेच सदर शासन निर्णयामध्ये आंबेगाव या गावाची आंबेगाव गावठाण ही ग्रामपंचायत असून शासनाच्या लिंक मध्ये दाखवली जात आहे. त्यामुळे तेथील सरपंचपद आरक्षण हा तेथील अनुसूचित जमातीचा हक्क आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे याचा पाठपुरावा केला असता अनुसूचित क्षेत्रातील गावांच्या यादीत या गावाचा उल्लेख आहे. तसेच शासन निंर्णय नुसार आंबेगाव गावचे पुनर्वसन करून तेथे आंबेगाव गावठाण ही वसाहत करून तेथे ग्रामपंचायत निर्माण करण्यात आली त्यामुळे तेथे गेली अनेक वर्षे अनुसूचित क्षेत्र म्हणून पेसा निधी दिला जातो व तो खर्चही केला जात आहे.
तहसील कार्यालयाने मात्र आंबेगावचे लोक तेथे राहतच नाहीत ,तेथे पेसा निधीच नाही अशी उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत,यावर सदर गावातील ग्रामस्थांनी आमचा हक्क आम्हाला द्यावा अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला आहे.