सिलाई वर्ल्डमध्ये ‘खरेदी भावात’ साड्या, पुरुषांसाठी ‘मार्केट से हाफ रेट’ ऑफर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:10 IST2021-04-04T04:10:48+5:302021-04-04T04:10:48+5:30

पुणे : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर खरेदीचा वेळ जरी कमी झालेला असला, तरीही या कमी वेळेत जास्त फायदा करून देण्याची संधी ...

Sarees at 'Purchase Price' in Sewing World, 'Market Se Half Rate' Offer for Men! | सिलाई वर्ल्डमध्ये ‘खरेदी भावात’ साड्या, पुरुषांसाठी ‘मार्केट से हाफ रेट’ ऑफर !

सिलाई वर्ल्डमध्ये ‘खरेदी भावात’ साड्या, पुरुषांसाठी ‘मार्केट से हाफ रेट’ ऑफर !

पुणे : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर खरेदीचा वेळ जरी कमी झालेला असला, तरीही या कमी वेळेत जास्त फायदा करून देण्याची संधी आता तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठीच सिलाई वर्ल्डने आणल्या दोन खास ऑफर्स ! महिलांसाठी बनारसी साड्या, प्युअर सिल्क शालू, डिझायनर व दुल्हन घागरा आणि पार्टी गाऊन्स आता खरेदीच्या भावात उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

हा खरेदीचा भाव होलसेल रेट, मिल रेट, मार्केट रेट पेक्षाही कमी असणार आहे. त्यामुळे ही भारी रेंज अवघ्या पंधराशे रूपयांपासून खरेदी करण्याचा महिलांना सर्वात मोठा फायदा मिळणार आहे. पुरुषांसाठी देखील ‘मार्केट से हाफ रेट’ देण्यात आलेला आहे. सूटस, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, सलवार कुर्ता ह्यासारखे शाही कपडे स्वस्तात मिळणार आहेत. विवाहासाठीचा ८,९९५ रूपयांचा ब्रँडेड ब्लेझर फक्त ११०१ रुपयांमध्ये घेण्याची संधीही मिळेल.

“सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून आम्ही ग्राहकांना कमी वेळेतही जास्त फायदा देण्याचा निर्णय घेतलेला आहे,” असे सिलाई वर्ल्डचे संचालक सागर गुजर यांनी सांगितले. ही ऑफर पुण्यातील कात्रज आंबेगाव, बाजीराव रोड, टिळक रोड, पौड रोड, चिंचवड व भिगवण रोड, बारामती येेथील शोरूमध्ये सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत उपलब्ध आहे. (वा. प्र.)

Web Title: Sarees at 'Purchase Price' in Sewing World, 'Market Se Half Rate' Offer for Men!