सरदेसाई रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा संप मागे

By Admin | Updated: June 19, 2014 05:28 IST2014-06-19T05:28:11+5:302014-06-19T05:28:11+5:30

पुणे जिल्हा भारतीय मजदूर संघाचे चिटणीस बाळासाहेब भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली रुग्णालयातील कामगारांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारपासून संप सुरू केला होता.

Sardesai Hospital employees' strike ends | सरदेसाई रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा संप मागे

सरदेसाई रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा संप मागे

तळेगाव दाभाडे : येथील मायमर मेडिकल कॉलेज व डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयातील कामगारांचा विविध मागण्यांसाठी सुरू असलेला बेमुदत संप सोमवारी चौथ्या दिवशी कामगार प्रतिनिधी व व्यवस्थापन समिती यांच्यामध्ये झालेल्या तडजोडीनंतर रात्री मागे घेण्यात आला. पुणे जिल्हा भारतीय मजदूर संघाचे चिटणीस बाळासाहेब भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली रुग्णालयातील कामगारांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारपासून संप सुरू केला होता. करारनाम्याचा मसुदा तयार करण्यात आला असून, त्यावर कॉलेज व रुग्णालयाच्या वतीने कार्यकारी संचालक डॉ. वीरेंद्र घैसास, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सीताराम चौगुले, उपकुलसचिव डॉ. यशवंत वाघमारे, तर कामगार प्रतिनिधी म्हणून पुणे जिल्हा मजदूर संघाचे चिटणीस बाळासाहेब भुजबळ, स्थानिक कामगार प्रतिनिधी विजय मनोहर भेगडे, रवींद्र किसन भेगडे, प्रदीप बनसोडे, संजय सोनवणे आदींची सही आहेत.
उभयतांमध्ये समझोता करार (मेमोरंडम आॅफ अंडरस्टॅँडिग - एम.ओ.यू) झाला असून, व्यवस्थापन व कामगारांनी या कराराचे स्वागत केले आहे. करारनामा मसुद्यात म्हटले आहे की, सर्व कामगार कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून घोषित होणारा महागाई भत्ता संस्थेच्या नियमानुसार देण्यात येईल. (वार्ताहर)

Web Title: Sardesai Hospital employees' strike ends