शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात 'सारथी बचाव' आंदोलन, छत्रपती संभाजीराजे यांचे उपोषण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 13:23 IST

मागील काही दिवसांपासून सारथी संस्थेतील अनेक वादविवाद समोर येत आहेत.

पुणे : पुण्यात 'सारथी बचाव' आंदोलन सुरु आहे. राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सारथी संस्थेच्या प्रवेशद्वारावर लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली आहे. छत्रपती संभाजीराजे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्याभरातून शेकडो विद्यार्थी पुण्यात दाखल झाले असून अनेक ठिकाणी भगवे झेंडे आणि सारथी बचाव आंदोलनाचे फ्लेक्स लावण्यात आले आहेत.

'मराठा, कुणबी समाजाच्या विकासासाठी स्थापन केलेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेबाबत (सारथी) विविध आदेश काढून, संस्थेला बदनाम केले जात आहे,' असा आरोप छत्रपती संभाजी राजे यांनी केला असून लाक्षणिक उपोषणाचा पवित्रा घेतला आहे. याचबरोबर, या आंदोलनाबाबत छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विट केले होते. सारथी संस्था वाचवण्यासाठी, मराठा समाजातील तरुणांच्या हक्कासाठी मी आयुष्यात पहिल्यांदा लाक्षणिक उपोषणाला बसणार आहे. गेले अनेक दिवस मी स्वतः या प्रकरणात लक्ष घातले आहे, विशेष म्हणजे या संस्थेचे उदघाटन माझ्या अध्यक्षतेखालीच झाले होते, असे ट्विट छत्रपती संभाजी राजे यांनी केले होते. 

दरम्यान, मागील काही दिवसांपासून सारथी संस्थेतील अनेक वादविवाद समोर येत आहेत. त्यासंदर्भात छत्रपती संभाजी राजे यांनी दोन दिवसांपूर्वी सारथी कार्यालयात बैठक घेतली. त्यावेळी छत्रपती संभाजी राजे म्हणाले, सारथी संस्थेवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते, त्याची चौकशी व्हावी पण ती प्रामाणिकपणे व योग्य अधिकाऱ्यांमार्फत होणे गरजेचे आहे. सारथी संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यांना संपूर्ण माहिती दिलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यावर त्वरीत बैठक घेवून यातून मार्ग काढणार असल्याचे सांगितले आहे. 

(सारथी संस्था बंद पडता कामा नये : खासदार छत्रपती संभाजी राजे )

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीPuneपुणे