कुरवंडी घाटात सराईत गुंडाचा खून

By Admin | Updated: March 21, 2015 23:08 IST2015-03-21T23:08:47+5:302015-03-21T23:08:47+5:30

घोडेगावजवळील कुरवंडी घाटात राजगुरूनगर येथील सराईत गुंड महेश अनंत भागवत (वय ३८) याचा अज्ञातांनी शुक्रवारी (दि. २०) रात्री ९ च्या सुमारास खून केला.

Sarat punda murder in Kurwandi Ghat | कुरवंडी घाटात सराईत गुंडाचा खून

कुरवंडी घाटात सराईत गुंडाचा खून

घोडेगाव : घोडेगावजवळील कुरवंडी घाटात राजगुरूनगर येथील सराईत गुंड महेश अनंत भागवत (वय ३८) याचा अज्ञातांनी शुक्रवारी (दि. २०) रात्री ९ च्या सुमारास खून केला. टोळी युध्दातून हा हल्ला झाल्याचा संशय आहे. त्याच्या भावावरही खूनी हल्ला करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार : कोटमदरा गावच्या हद्दीत कुरवंडी घाटात रात्री ९ च्या सुमारास रक्ताच्या थारोळयात एक जण पडला असल्याचे गिरवली येथील सुनील अभंग यांनी पोलिसांना खबर दिली. घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली. बहुतेक घाटात अपघात घडला असावा, असा संशय त्यांना जाताना वाटले.
घटनास्थळी गिरीश दिघावकर व त्यांच्या पोलीस सहकाऱ्यांनी पाहणी केली असता धारदार शस्त्रांनी त्याच्यावर वार केल्याचे व तो जाग्यावरच मृत असल्याचे त्यांना आढळून आले. या घटनेची माहिती घेत असतानाच मंचर पोलीास ठाण्यामधून पोलीस हवालदार युवराज भोजणे यांनी पेठ कुरवंडी घोडेगाव रस्त्यावर कोल्हारवाडी फाट्याजवळ एका दुचाकीला (एमएच १४/७७७१) अपघात झाला असून याच्या जवळपास एक सत्तूर, एक चॉपर, एक तलवार, एक लाकडी दांडा, एक मोबाईल व चपलांचा जोड असल्याचे घोडेगाव पोलिसांना सांगितले. या माहितीवरून मंचर व घोडेगाव पोलिसांनी आरोपींचा माग घेण्याचा प्रयत्न केला; परंतु कोणी हाती लागले नाही. या ठिकाणी सापडलेल्या सर्व हत्यारांवर रक्त लागलेले होते.

४दरम्यान, घटनास्थळी पंचनामा करून मृताचा मृतदेह घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. त्याच्या छाती, गळा, तोंडावर धारदार शस्त्रांनी मोठ्या प्रमाणावर वर केले होते. त्यामुळे चेहरा ओळखू येत नव्हता. तो मृत राजगुरूनगर येथील असावा, असा संशय पोलिसांना आला.
४यावरून राजगुरूनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांना बोलाविण्यात आले. त्यांनी महेश भागवत असल्याचा प्राथमिक अंदाज लावला. पोलिसांनी त्याचे वडील व बायको त्यांना ओळख पटविण्यासाठी बोलावले असता त्यांनी हा महेश असल्याचे सांगितले. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर यांच्यासह एस. एम. हांडे करीत आहेत.

Web Title: Sarat punda murder in Kurwandi Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.