कोरोना रुग्णांना सेवा देण्यासाठी सरसावली जुन्नरची तरुणाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:10 IST2021-04-07T04:10:24+5:302021-04-07T04:10:24+5:30

वडज येथील सामाजिक कार्यकर्ते नीलेश चव्हाण यांनी यासंदर्भात समाज माध्यमावर आवाहन केले आह. सावरगाव धालेवाडी ...

Saraswati Junnar's youth to serve Corona patients | कोरोना रुग्णांना सेवा देण्यासाठी सरसावली जुन्नरची तरुणाई

कोरोना रुग्णांना सेवा देण्यासाठी सरसावली जुन्नरची तरुणाई

वडज येथील सामाजिक कार्यकर्ते नीलेश चव्हाण यांनी यासंदर्भात समाज माध्यमावर आवाहन केले आह. सावरगाव धालेवाडी जिल्हा परीषद गटातील करोना रुग्णांना आपण स्वतः वाहन घेऊन रुग्णाच्या घरी जाऊन नेणार असल्याचे सांगितले आहे. युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमोल लांडे यांनी आदीवासी भागात रुग्णसेवेसाठी वाहन उपलब्ध करणार असल्याचे सांगीतले तसेच बेलसर येथील कमलेश वंडेकर यांनी सोमतवाडी, निरगुडे, बेलसर, सुराळे, खानगाव, बोतार्ड आपटाळे परिसरातील करोना रुग्णांना शासकीय व खासगी रुग्णालयात देण्यासाठी स्वतः असल्याचे सांगत स्वतःचे वाहन देणार असणार असल्याचे सांगितले आहे. तसेच जुन्नर येथील राज फाउंडेशनचे श्रीकांत जाधव यांनीदेखील अत्यवस्थ रुग्णासाठी ऑक्सिजनचा पुरवठा असनारे बेड उपलब्ध नसल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Saraswati Junnar's youth to serve Corona patients