भोरमध्ये सर्रास गुटखा विक्री

By Admin | Updated: September 15, 2014 05:21 IST2014-09-15T05:21:46+5:302014-09-15T05:21:46+5:30

राज्य शासनाने गुटखाविक्रीवर बंदी घातलेली असतानाही भोर शहरातील टपऱ्यांवर तसेच दुकानात सर्रासपणे गुटखावीक्री होत आहे.

Saras Gutkha sales in the morning | भोरमध्ये सर्रास गुटखा विक्री

भोरमध्ये सर्रास गुटखा विक्री

भोर : राज्य शासनाने गुटखाविक्रीवर बंदी घातलेली असतानाही भोर शहरातील टपऱ्यांवर तसेच दुकानात सर्रासपणे गुटखावीक्री होत आहे. मूळ १२ रुपये किंमतीचा गुटखा २० ते ५० रुपयांपर्यंत विकला जात आहे. गुटखा बंदीमुळे विक्री करणारे आपले उखळ पांढरे करीत असून खाणारे जादा पैसे देऊन आपला शोक भागवत आहेत. याकडे शासकीय यंत्रणेसह पोलीसांचेही दुर्लक्ष होत असल्याने शासनाच्या गुटखा बंदीचा बोजवारा उडाला आहे.
लोकांच्या आरोग्याला धोका होऊ नये म्हणून शासनाच्या वतीने गुटखा बंदीचा निर्णय घेण्यात आला. यामुळे शासनाचा १०० कोटीचा महसुल वर्षाला बुडणार आहे. तरी शासनाने निर्णय घेतला ही कौतुकास्पद बाब आहे. मात्र राज्य शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी काही दिवसच चालली, त्यानंतर गुटखा विक्री पुन्हा सुरू झाली आहे.
भोर शहरातील टपऱ्यांवर चोरून गुटखा विक्री केली जाते. ५० रूपयांपर्यंत दुकानदार गुटखा विक्री करित आहेत. गुटखा खाणारे जास्त किंमत देऊन गुटखा घेत आहे. मात्र हौसे पुढे मोल नाही.
याचाच गैर फायदा घेऊन गुटखा विक्री करणारे आपले उखळ पांढरे करीत आहेत. शासनाचा गुटखा विक्रीचा निर्णय योग्य आहे. परंतु तो बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांवर कायदेशिर कारवाही करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Saras Gutkha sales in the morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.