टेम्पो चोरल्या प्रकरणी सराईताला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:10 IST2021-04-16T04:10:10+5:302021-04-16T04:10:10+5:30

पुणे : घरासमोर पार्क केलेला टेम्पो चोरल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी एका सराईत वाहनचोराला अटक केली. न्यायालयाने त्याला १६ एप्रिलपर्यंत पोलीस ...

Saraita arrested for stealing tempo | टेम्पो चोरल्या प्रकरणी सराईताला अटक

टेम्पो चोरल्या प्रकरणी सराईताला अटक

पुणे : घरासमोर पार्क केलेला टेम्पो चोरल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी एका सराईत वाहनचोराला अटक केली. न्यायालयाने त्याला १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

राजू जावळकर (वय ५५) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत ४१ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. दि. ६ ते ७ एप्रिल २०२१ दरम्यान वाकड परिसरात ही घटना घडली.

फिर्यादींनी त्यांचा मालवाहू टेम्पो घरासमोर पार्क करून ठेवला होता. चोरट्याने टेम्पोचे लॉक तोडून तो लंपास केला, असे फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी राजू याला न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्यातील टेम्पो जप्त करण्यासाठी, तो सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर शंभरहून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्याचा तपास करण्यासाठी, त्याने अशा प्रकारचे आणखी किती गुन्हे केले आहेत?, त्याचा आणखी कोणी साथीदार आहेत? का? याचा तपास करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील ज्ञानेश्वर मोरे यांनी केली.

Web Title: Saraita arrested for stealing tempo