सराईत गुन्हेगार तडीपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:09 IST2021-02-08T04:09:59+5:302021-02-08T04:09:59+5:30
पुणे : शिवाजीनगर गावठाण परिसरात दहशत निर्माण करणारा व महिलांना त्रास देणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे ...

सराईत गुन्हेगार तडीपार
पुणे : शिवाजीनगर गावठाण परिसरात दहशत निर्माण करणारा व महिलांना त्रास देणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी २ वर्षांसाठी पुणे शहर व जिल्ह्यातून तडीपार केले.
ऋषिकेश नितीन पवार ऊर्फ बाळा पवार (वय २९, रा. शिवाजीनगर गावठाण) असे त्याचे नाव आहे. बाळा पवार हा शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. मोबाईलच्या माध्यमातून महिलांना त्रास देणारा, सामाजिक स्थैर्य नष्ट करत होता. महिलांना त्रास दिल्याचे ३ गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलिमा पवार, निरीक्षक विक्रम गौड, सहायक निरीक्षक रामदास मुंडे, उपनिरीक्षक किसन राठोड, पोलीस शिपाई राहुल होळकर, नागरे, ढमढेरे यांनी तडीपारीचा प्रस्ताव तयार केला. पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी त्याला मंजुरी दिली.