सराईत दुचाकीचोर गजाआड
By Admin | Updated: December 24, 2016 00:39 IST2016-12-24T00:39:12+5:302016-12-24T00:39:12+5:30
शहराच्या विविध भागांमध्ये दुचाकीचोरी करणाऱ्या दोघा जणांना गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या

सराईत दुचाकीचोर गजाआड
पुणे : शहराच्या विविध भागांमध्ये दुचाकीचोरी करणाऱ्या दोघा जणांना गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून वाहनचोरी, सोनसाखळीचोरी आणि मोबाईलचोरीचे एकूण अकरा गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे.
वैभव बाळासाहेब इंगळे (वय १८, रा. समर्थनगर, सिंहगड रस्ता), कासीम सलीम इराणी (वय १८, रा. पठारेवस्ती, लोणी काळभोर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. (प्रतिनिधी)