सराईत दुचाकीचोर गजाआड

By Admin | Updated: December 23, 2016 01:11 IST2016-12-23T01:11:48+5:302016-12-23T01:11:48+5:30

शहराच्या विविध भागांमध्ये दुचाकीचोरी करणाऱ्या दोघा जणांना गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने

Saraiet bolt | सराईत दुचाकीचोर गजाआड

सराईत दुचाकीचोर गजाआड

पुणे : शहराच्या विविध भागांमध्ये दुचाकीचोरी करणाऱ्या दोघा जणांना गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या
पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून वाहनचोरी, सोनसाखळीचोरी आणि मोबाईलचोरीचे एकूण अकरा गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे.
वैभव बाळासाहेब इंगळे (वय १८, रा. समर्थनगर, नांदेड फाटा, सिंहगड रस्ता), कासीम सलीम इराणी (वय १८, रा. इराणी गल्ली, पठारेवस्ती, लोणी काळभोर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. इराणीविरुद्ध ठाणे शहरात वाहनचोरीचे गुन्हे दाखल आहेत. ठाण्यात चोरलेल्या वाहनांवरून पुण्यात येऊन चोऱ्या करण्याची त्याची पद्धत आहे. तर गेल्या महिन्यात गुन्हे शाखेने पकडलेल्या शाम्या ऊर्फ योगेश सोनवणे या सराईताचा इंगळे हा जोडीदार आहे.
आरोपींकडून चार दुचाकी, दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. ही कारवाई उपायुक्त पी. आर. पाटील, सहायक आयुक्त, सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सीताराम मोरे यांच्या पथकाने केली. (प्रतिनिधी)

Web Title: Saraiet bolt