शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
2
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
3
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
4
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
5
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
6
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
7
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
8
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
9
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
10
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
11
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
12
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
13
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
14
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
15
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम
16
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
17
या वर्षीच्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा, अमेरिकेच्या 2 तर जपानच्या एका संशोधकाचा संयुक्त सन्मान
18
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
19
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
20
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले

Ashadhi Wari: उरळी कांचनमध्ये तुकोबांच्या पालखी सोहळ्यात गोंधळ; वर्षानुवर्षाची विसाव्याची परंपरा खंडित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 20:32 IST

आमच्यामुळे जर वारकऱ्यांना त्रास झाला असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, उरुळी कांचनच्या सरपंचांनी मागितली माफी

उरुळी कांचन:  जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा यामध्ये उरुळी कांचन येथील पालखी विसावा यात बदल  विश्वस्तांनी केला होता. या विश्वस्तांच्या बदला संदर्भात उरुळी कांचन ग्रामस्थ पुढारी यांची मागील काही दिवसांपूर्वी राम मंदिरात बैठक होऊन जर पालखी परंपरेनुसार गावामध्ये आली नाही तर गावबंद असहकाराची घोषणा करण्यात आली होती. यामध्ये विश्वस्तांनी वर्षानुवर्ष आश्रम रस्त्याने भैरवनाथ मंदिराकडे पालखी जाते . तो मार्ग विश्वस्तानी रद्द केला होता.  त्याचा विरोध ग्रामस्थ व नेतेमंडळी करीत होती.         बुधवारी (दि०३) रोजी पालखी सोहळा पुणे सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन एलाईट चौकामध्ये आली असता ग्रामस्थांनी पालखी पारंपारिक रिवाजाने गावाला प्रदक्षिणा घालून मार्गस्थ करावा अशी मागणी केली. मात्र त्याला विश्वस्तांनी विरोध केल्याने ग्रामस्थांनी नगारा रथ अडवून धरला. वाढत्या नागरीकरणाचे व रस्त्याचे कारण विश्वस्तांनी दिले होते. सालाबादप्रमाणे उरळीकांचन शहरांमधून पालखी जावी व पुढे विश्रांतीसाठी महात्मा गांधी महाविद्यालयाच्या मैदानावर थांबावी यासाठी ग्रामस्थ पुढारी नेते मंडळी आग्रही होते. परंतु पालखी चौकात येण्याअगोदर ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामस्थ, पुढारी चौकामध्ये ठिय्या मारून भजन करत बसले होते. पोलीस प्रशासनने त्यांना रस्त्यावरून बाजूला करत पालखीला रस्ता मोकळा करून देण्याचा प्रयत्न केला.        ग्रामस्थांचा हा गोंधळ पाहून विश्वस्तांनी नगारा बैलगाड्याचे बैल सोडून विरोध दर्शवला. यामध्ये ग्रामस्थ, पोलीस प्रशासन, व विश्वस्त यांच्यात वादावादी झाली. या वादविवादानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतः नगारा रथ ओढत पुढे नेला व नगाऱ्याला बैल जुंपण्यास सांगितले. ग्रामस्थांनी यावेळेस माणिक मोरे मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या. या गोंधळानंतर पालखी उरुळी कांचन शहरात विसाव्यासाठी न जाता पुढे निघून गेली. वर्षानुवर्षाची परंपरा खंडित झाली. पालखी विसाव्या ठिकाणी न गेल्यामुळे भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे बऱ्याच भाविकांना पालखीचे दर्शन घेता आले नाही.     पालखी विसावा महात्मा गांधी महाविद्यालयाच्या मैदानावर होणार होता यासाठी दर्शन मंडप सुद्धा टाकण्यात आला होता. त्याचप्रमाणे जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. महात्मा गांधी महाविद्यालय मैदानावर पालखी विसावा मंडप उभारण्यात आला होता. त्यामुळे आम्ही लोक महामार्गावर गर्दी न करता महाविद्यालयाच्या मैदानावर गेलो होतो. परंतु पालखी विसाव्यासाठी न आल्याने आम्हाला दर्शन घेता आले नाही. यावर्षी आमचे पालखीचे दर्शन झाले नाही असे पंचक्रोशीतील नागरिक व महिलांनी सांगितले. 

...तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो    रात्री कदमवाक वस्ती येथे विश्वस्तांबरोबर चर्चा करून  सालाबाद प्रमाणे पालखी मार्ग ठेवावा यासाठी विनंती केली होती. परंतु बाकी विश्वतांपेक्षा माणिक मोरे यांनी विरोध केला व पंचक्रोशीतील भाविकांचे मन दुखावले आहे. एकट्याच्या या आडमुठेपणा धोरणामुळे वर्षानुवर्षाची परंपरा खंडित झाली आहे. आमच्यामुळे जर वारकऱ्यांना त्रास झाला असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. - उरुळी कांचन सरपंच अमित कांचन.

टॅग्स :Puneपुणेashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022Sant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाuruli kanchanउरुळी कांचनPandharpurपंढरपूरsarpanchसरपंच